ZP सदस्याच्या अंगावर अभियंत्याने गाडी घातली : माफीवर प्रकरण मिटले

लातूर व रेणापूर तालुका देण्यास विरोध करणाऱ्या एका जिल्हा परिषद सदस्याच्या अंगावर अभियंत्याने आपली चारचाकी गाडी घातली. जिल्हा परिषदेच्या पंपहाऊस जवळ सदस्य उभारलेले असताना हा प्रकार घडला. प्रसंगाधान राखून सदस्याने आपला जीव वाचवला. या सदस्याने आपल्या गटनेत्यासह अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. शेवटी या सदस्याची बाजू उचलून धरत अनेक सदस्यांनी बुधवारी अध्यक्ष लातूरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली.
zp latur
zp latur

लातूर : जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्याने जिल्हा परिषदेच्याच एका सदस्यांच्या अंगावर आपले चारचाकी वाहन घातले. प्रसंगावधान राखून सदस्याने आपला जीव वाचवला. मागील आठवड्यात घडलेल्या या घटनेवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे यांच्या कक्षात बुधवारी (ता. ११) धीरगंभीर चर्चा झाली. श्री. लातूरे यांनी संबंधित अभियंत्याला जाब विचारला. त्यावर खड्डा चुकवताना गाडी चुकून अंगावर गेल्याचे सांगत त्याने माफी मागितली आणि या विषयावर पडदा पडला. यात ज्या विषयावरून हा प्रकार घडल्याचा सदस्यांचा आरोप होता. त्या विषयात शेवटी अभियंत्यांनी बाजी मारल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.


जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध स्वरूपाची विद्युतीकरणाची कामे करण्यात येतात. अन्य सरकारी कामांच्या तुलनेत या कामात मोठे मार्जीन असते, ही गोष्ट आता लपून राहिली नाही. यामुळे विद्युतीकरणाच्या कामात सातत्याने शॉक बसण्याचे प्रकार घडून येतात. मागील काही वर्षात या कामाचे मूल्यांकन करणाऱ्या अभियंत्याच्या वर्तनावरून सदस्यांना सतत शॉक बसत आहे.

जिल्ह्यात या कामाचे मुल्यांकन (मोजमाप) करणारे दोनच अभियंता आहेत. यामुळे अभियंत्याकडील तालुक्यांची सातत्याने अदलाबदल सुरू असते. अभियंता विरूद्ध पदाधिकारी असे शॉटसर्किट सातत्याने जिल्हा परिषदेत सुरू असते. त्याची झळ कामांसोबत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांतील सुसंवादाला बसते. पदाधिकाऱ्यांचे न ऐकल्यास संबंधित अभियंत्याकडून तालुका काढून घेण्याची मागणी सुरू होते. यातूनच एका अभियंत्यांकडील तालुके सातत्याने बदलले जातात. लातूर आणि रेणापूर तालुका एका अभियंत्याकडे देऊ नये, अशी मागणी काही सदस्यांनी केली आहे. अभियंत्याच्या पूर्वीच्या वर्तनावरून त्याला काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. मागील काही दिवसात त्यावरून जिल्हा परिषदेत धुसफुस सुरू आहे.

यातच अभियंत्याला लातूर व रेणापूर तालुका देण्यास विरोध करणाऱ्या एका जिल्हा परिषद सदस्याच्या अंगावर अभियंत्याने  आपली चारचाकी गाडी घातली. जिल्हा परिषदेच्या पंपहाऊस जवळ सदस्य उभारलेले असताना हा प्रकार घडला. प्रसंगाधान राखून सदस्याने आपला जीव वाचवला. या सदस्याने आपल्या गटनेत्यासह अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. शेवटी या सदस्याची बाजू उचलून धरत अनेक सदस्यांनी बुधवारी अध्यक्ष लातूरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली.

या वेळी सदस्याने त्याच्यावर गुजरलेला प्रसंग कथन केला. त्यावर लातूरे यांनी मोबाईलवरूनच अभियंत्याला जाब विचारला. त्यावर त्याने खड्डा चुकवताना गाडी सदस्याच्या अंगावर गेल्याचा खुलासा करून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्यावर चर्चा होऊन घटनेवर पडदा टाकण्यात आला. या स्थितीत विरोध असतानाही संबंधित अभियंत्याला लातूर आणि रेणापूर तालुक्याची जबाबदारी देण्यात आली. सदस्याच्या तक्रारीवरून अभियंत्याची चौकशी करण्याचेही आदेश दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, या घटनेमुळे विरोधी सदस्यांत तीव्र नाराजी व्यक्त असून अभियंत्याला नेमके पाठबळ कोणाचे, हा प्रश्नही सदस्यांना सतावत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com