जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील  पोटनिवडणुकांचे 6 एप्रिलला मतदान

धुळे, वर्धा व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध बारा पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 6 एप्रिलला मतदान; तर 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार .
election_Sahariya
election_Sahariya

मुंबई  : धुळे, वर्धा व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध बारा पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 6 एप्रिलला मतदान; तर 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, या सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 17 ते 22 मार्च 2018 या कालावधीत स्वीकारली जातील. 18 मार्च 2018 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.

जिल्हा परिषद- पोटनिवडणूक होणारे निवडणूक विभाग:

22-चिमठाणे (ता. शिंदखेडा, जि. धुळे), 19-हमदापूर (ता. सेलू, जि. वर्धा) आणि 30-आनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद).

पंचायत समिती- पोटनिवडणूक होणारे निर्वाचक गण:

61- पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), 87-नगाव (ता. जि. धुळे), 71-साक्री (ता. साक्री, जि. धुळे), 77-तुर्काबाद (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), 60-संवदगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद), 66-सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड), 83-मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड), 77-काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद), 78-सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया), 92-आजंती (ता. हिंगणघाट, जि. वर्धा), 64-घुग्घुस-2 (ता. जि. चंद्रपूर) आणि 22-मानापूर (ता. आरमोरी, जि. गडचिरोली).
 

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 17 ते 22 मार्च 2018
नामनिर्देशनपत्रांची छाननी- 23 मार्च 2018
अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 28 मार्च 2018
अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 02 एप्रिल 2018
मतदानाचा दिनांक- 06 एप्रिल 2018
मतमोजणीचा दिनांक- 07 एप्रिल 2018

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com