zero pendency in ALL ZPs | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

सर्व जिल्हा परिषदांत 15 ऑक्टोबरपर्यंत झिरो पेंडन्सी : पंकजा मुंडे

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांना राबविलेला झिरो पेन्डन्सी हा उपक्रम राज्यात चर्चेत आहे. यामुळे प्रशासनात निर्णय़प्रक्रियेची गती वाढते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आता आपल्या खात्यात हा उपक्रम सुरू करण्यासाठी पावले उचलली आहे. या निर्णय़ाचा फायदा साहजिकच ग्रामीण जनतेला होऊ शकतो.

पुणे : राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांनी येत्या 15  आपापल्या कार्यक्षेत्रात शून्य प्रलंबिता आणि दैनंदिन निर्गंती (झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल) हा उपक्रम राबविण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. 

या उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा राज्यस्तरावर खास गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी आदेशात म्हटले आहे. पुणे जिल्हा परिषदेत सप्टेंबर महिन्यात सात आणि आठ तारखेला राज्यातील जिल्हा परिषदांच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेला सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते. या परिषदेत पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी या उपक्रमाचे सादरीकरण केले होते. शिवाय पुणे विभागातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्याचे मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तेव्हाच या उपक्रमाचे कौतुक करत, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये याची अंमलबजावणी करण्याची घोषणा मुंडे यांनी केली होती. 

"ग्रामविकास विभागाकडे माहिती पाठवावी' 

राज्यात 1 ते 15 ऑक्‍टोबर या कालावधीत मिशन अंत्योदय, ग्रामसमृद्धी स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यानिमित्त हा उपक्रम राबविण्यात यावा आणि याबाबतच्या दैनंदिन कार्यवाहीचा आढावा, छायाचित्रे आणि व्हिडिओ हे व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाकडे पाठवावेत, असेही या आदेशात मुंडे यांनी नमूद केले आहे. 
 

संबंधित लेख