Z. P. Members to give memorandum to MLAs | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी जि.प. सदस्य देणार आमदारांना निवेदन 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

औरंगाबाद   :  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कर्जमाफी करावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील आमदारांना निवेदन देण्याचा निर्णय मराठा समाजातील जिल्हा परिषद सदस्यांनी घेतला आहे.

 9 ऑगस्ट रोजी मुंबईत निघणारा मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी (ता.2) जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत करण्यात आला. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे. 

त्याचप्रमाणे शेतीमालाला भाव मिळावा, कर्जमाफी करावी यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील सर्व आमदारांना देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड. देवयानी कृष्णा डोणगावकर, उपाध्यक्ष केशव तायडे, सभापती विलास भुमरे, मीना शेळके, गटनेते अविनाश गलांडे, शिवाजी पाथ्रीकर, किशोर बलांडे, ज्ञानेश्वर मोटे, पुष्पा काळे, अनुराधा चव्हाण, हिंदवी खंडागळे यांची उपस्थिती होती. 

निर्णय घेण्यास भाग पाडा, नसता राजीनामा द्या 
 सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. प्रत्येक मराठा आमदारांनी समाजाचे  लक्षवेधी प्रश्न अधिवेशनात आवर्जुन मांडावेत, सरकारकडून उत्तर  घ्यावे, ठोस निर्णय घेण्यास भाग पाडावे अन्यथा राजीनाम द्यावा, असे 
खरमरीत पत्र आमदारांना घरपोच देण्याचा निर्णय देखील मराठा क्रांती  मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

संबंधित लेख