yuva sena thakare | Sarkarnama

आजचा वाढदिवस - आदित्य ठाकरे - युवासेना प्रमुख

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जून 2017

आदित्य ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. ते शिवसेनेच्या युवकांसाठी असलेल्या "युवासेना" या शाखेचे प्रमुख आहेत. 17 आक्‍टोबर 2010 रोजी युवा सेनेची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी आता शिवसेनेतही महत्वाची जबाबदारी पार पाडायला सुरवात केली आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकात त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन त्यांनी आपल्या राजकारणाला सुरवात केली. मुंबईच्या नाईट लाईफच्या प्रश्नावर त्यांनी लक्ष वेधले होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी सक्रिय राजकारणाला सुरवात केली.

आदित्य ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. ते शिवसेनेच्या युवकांसाठी असलेल्या "युवासेना" या शाखेचे प्रमुख आहेत. 17 आक्‍टोबर 2010 रोजी युवा सेनेची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी आता शिवसेनेतही महत्वाची जबाबदारी पार पाडायला सुरवात केली आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकात त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन त्यांनी आपल्या राजकारणाला सुरवात केली. मुंबईच्या नाईट लाईफच्या प्रश्नावर त्यांनी लक्ष वेधले होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी सक्रिय राजकारणाला सुरवात केली. त्यांचा " माय थॉंट इन व्हाईट ऍन्ड ब्लॅंक " हा एक कविता संग्रही प्रसिद्ध झाला असून ते संगीतामध्ये रुची घेतात. "उम्मीद' हे त्यांचा अल्बमही प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता आदित्य ठाकरे यांनी राज्यव्यापी दौरेही करण्यास सुरवात केली आहे. 

संबंधित लेख