youthcongress election satara issue | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मारामारी करणाऱ्या युवकांना पृथ्वीराजबाबा रात्री उशिरापर्यंत समजावत होते!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

मोरे यांचे समर्थक अन्याय झाल्याच्या भावना व्यक्त करत आहेत.

कऱ्हाड (सातारा) : युवक कॉग्रेसच्या पदाधिकारी निवडीनंतर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील व विद्यार्थी कॉग्रेसचे शिवराज मोरे यांच्या समर्थकांमध्ये धुमश्‍चक्री झाली. दोन्हीकडील समर्थकांनी एकमेकांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर टाकलेल्या पोस्टमुळे कॉग्रसतंर्गत गटातील वातावरण बरेच ढवळून निघाले आहे. 

युवक कॉंग्रसेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक निकालानंतर उंब्रज ते तासवडे दरम्यान एनएसयुआयचे माजी अध्यक्ष शिवराज मोरे आणि जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांच्या समर्थकांच्या दोन गटात जोरदार धुमश्‍चक्री झाली. या बाबत पोलिसात तक्रार दाखल नाही. त्यामुळे त्याची दबक्‍या आवाजात चर्चा होती. याचा गाजावाजा होऊनये म्हणून सर्वच नेत्यांनी शांतता पाळली. तसेच रात्री उशिरापर्यंत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंगल्यात दोन्ही गटात समझोता सुरू होता. पण तोडगा निघाला नाही. त्यामुळे दुसऱ्यादिवशी दिवसभर बैठक सुरू होत्या. या धुमश्‍चक्रीची मात्र सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे.दोन्ही गटांनी एकमेकांना टार्गेट करत त्यांच्या पोस्ट शेअर केल्या होत्या.

फेसबुक, ट्युटर, वॉटसअपवर मोरे यांचे समर्थक अन्याय झाल्याच्या भावना व्यक्त करत आहेत. त्याला आनंदराव पाटील गटाचे समर्थक प्रत्युत्तर देणाऱ्या पोस्टही फिरवत होते. दोन गटात राडा, कॉग्रेस कोमात, भाजप जोमात.... अशाही पोस्ट फिरत होत्या. काही पोस्ट घराणेशाही, एकाधिकारशाहीवर टीका करणाऱ्या होत्या. 

संबंधित लेख