Youth wings of political parties are ready for collage elections | Sarkarnama

महाविद्यालयीन निवडणुकांसाठी पक्षीय युवा आघाड्या सज्ज 

मुरलीधर कराळे सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 मे 2017

 निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळातही विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थी लोकशाहीशी जोडले जावेत, यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

पूर्वी महाविद्यालयात निवडणुका होत असे. त्यातील गैरप्रकार वाढल्याने 2014 पासून त्या बंद करण्यात आल्या होत्या. नवीन कायद्यानुसार आता पुन्हा निवडणुका सुरू होणार आहेत. 

नगर:  नवीन विद्यापीठ कायद्यामुळे आता प्रत्येक महाविद्यालयांत विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुका होणार आहेत. महाविद्यालयात आपलाच विद्यार्थी असावा, यासाठी पक्षीय पातळीवरील युवा आघाड्या सरसावल्या आहेत.

जुलैअखेर किंवा ऑगस्टमध्ये या निवडणुका होणार असल्याने संभाव्य विद्यार्थ्यांचे पक्षप्रवेश करून घेण्यात येत आहेत. तसेच युवा आघाडीत विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेतली जात आहे. 

राज्यात नवीन विद्यापीठ कायदा एक मार्चपासून लागू झाला. संशोधन मंडळ, नवउपक्रम, नवसंशोधन मंडळ, सल्लागार परिषद, यामधील उद्योग व संशोधन जगतातील तज्ज्ञांच्या सहभागाने विद्यापीठातील शिक्षण अद्ययावत होणार आहे.

 निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळातही विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थी लोकशाहीशी जोडले जावेत, यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

पूर्वी महाविद्यालयात निवडणुका होत असे. त्यातील गैरप्रकार वाढल्याने 2014 पासून त्या बंद करण्यात आल्या होत्या. नवीन कायद्यानुसार आता पुन्हा निवडणुका सुरू होणार आहेत. 

दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बहुतेक पक्षांच्या युवा आघाडीने आपल्या पक्षात चांगल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी मेळावे घेतले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने तर राज्यभरात 44 पेक्षा जास्त र्मोचे काढले. सुमारे दीड लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरविले.

"स्टुडंट फ्रेंडली पार्टी' करण्याकडे अनेक पक्षांनी भर दिल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर निवडणुकीचे वारे अधिक जोराने वाहू लागणार आहेत. 

 

राष्ट्रवादीची तयारी पूर्ण: कोते 

महाविद्यालयांमध्ये निवडणुका व्हाव्यात, यासाठी मागील एक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करीत होतो. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी या निवडणुका आवश्‍यक आहेत; परंतु निवडणुकांतील गैरप्रकार टाळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना संरक्षण मिळणे आवश्‍यक आहे, असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

युवतींचे संघटन सुरू : कोळपकर 

नवीन कायद्यामुळे महाविद्यालयांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवती आघाडीची तयारी सुरू आहे. विद्यार्थींनींच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून चांगले काम झाले आहे. आगामी निवडणुकांसाठी आमचे युवती संघटन वेगाने सुरू आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवतीसेलच्या जिल्हाध्यक्षा अमृता कोळपकर यांनी सांगिले. 

कॉंग्रेसकडून राज्यभर मोहीम :  मोरे 
कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता शिबिरे घेऊन युवकांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर युवक कॉंग्रेसमध्ये दाखल करण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात महाविद्यालयातील निवडणुकांसाठी चांगले उमेदवार दिले जाणार आहेत, असे प्रदेश कॉंग्रेसचे विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे राज्य उपाध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले. 

महाविद्यालये तयार: देशपांडे 

नवीन कायद्यानुसार इंडस्ट्रीज व महाविद्यालये यांतील अंतर कमी होणार आहे. म्हणजेच इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन औद्योगिक क्षेत्र वापरण्याचा प्रयत्न करेल. तसेच इतर विद्यापीठ, इतर देशांतील प्राध्यापक, संशोधक आदानप्रदान होणार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने हा कायदा योग्यच राहणार आहे. महाविद्यालयीन निवडणुकांसाठी महाविद्यालयाचे प्रशासनही योग्य ती तयारी करीत आहे, असे छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार देशपांडे यांनी सांगितले.

संबंधित लेख