निराधारांना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उभारणार लढा 

निराधारांना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उभारणार लढा 

उस्मानाबाद ः विविध अर्थसाह्य योजनेअंतर्गत असलेल्या निराधारांच्या अनुदानात वाढ करावी, या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निराधारांना आधार हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरवात 30 जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. 

या संदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनाथ, निराधार, वृद्ध, अपंग आणि विधवांना विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गत अनुदान देण्यात येते. या योजनेचे जिल्ह्यात एक लाख 66हजार 799 नोंदणीकृत लाभार्थी आहेत. त्यांना शासनाकडून 600 ते 900 दरमहा अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेंतर्गत केवळ ते रुपये तुटपुंजे अर्थसहाय्य दिले जाते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना देण्यात येत असलेल्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली नाही. 

सध्याची वाढती महागाई लक्षात घेता अनुदानात वाढ करण्याची गरज आहे. मदतीची गरज असूनही जाचक अटींमुळे अशांना योजनेचा लाभ मिळत नाही. उत्पन्नाची आर्थिक मर्यादा, पाल्याचे वय या कारणांखाली निवड केली जात नाही. कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 21 हजार रुपयांवरून 40 हजार करावी, पाल्याचे वय 21 वर्षांपेक्षा अधिक असल्यास या योजनांतर्गत निवड केली जात नाही. परंतु अनेक पाल्य आपल्या पालकांचा सांभाळ करीत नाहीत. त्यामुळे ही अट शिथिल करावी.

जिल्ह्यातील निराधार, अनाथ, वृद्ध, अपंग आणि विधवांना विविध योजनेंतर्गत देण्यात येत असलेल्या अनुदानामध्ये वाढ करावी, लाभार्थी निवड करताना उत्पन्नाची मर्यादा वाढवावी, पाल्याच्या वयाची अट शिथिल करावी, अनुदान घरपोच करावे या मागण्यांबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. 

येत्या 30जूनपासून गावोगावी जाऊन निराधारांच्या व्यथा अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी निराधारांना आधार या विशेष अभियानाची सुरवात करणार आहेत. या अभियानाची सुरवात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com