youth congress election | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

सत्य "जीत' झाले अध्यक्ष; विश्‍व "जीत' ठरले किंगमेकर ! 

उमेश घोंगडे 
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सत्यजीत तांबे यांची शुक्रवारी निवड झाली. गेल्या काही वर्षांपासून या पदासाठी इच्छुक असलेल्या तांबे यांना बरीच धावपळ केल्यानंतर ही संधी मिळाली. जुन्या वादावर पडदा टाकत आमदार विश्वजित कदम यांनी सत्यजीत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या साऱ्या निवडणुकीत मावळते अध्यक्ष विश्वजित हे किंगमेकर ठरले आहेत. 

या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, बाळासाहेब थोरात व हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर तांबे यांच्या नावाला अंतिम रूप देण्यात आले. 

या निवडणुकीसाठी दोन लाख 55 हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यापैकी स्वत: कदम यांच्यावतीने केलेल्या मतदारांची संख्या होती 80 हजार. शिवाय त्यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मतदारांची संख्या सुमारे 20 हजार इतकी होती. एकूण मतदारांमधील सुमारे एक लाख मतदार एकट्या कदम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केलेले होते. त्यामुळे निवडून कुणाला आणायचे याची सारी सूत्रे कदम यांच्या हाती होती. परिणामी सुरवातीपासून कदम यांचा या निवडणुकीत वरचष्मा होता. त्यातच प्रदेशाध्यक्ष चव्हाण, विखे-पाटील व हर्षवर्धन पाटील यांचा कदम यांच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास असल्याने कदम यांना अधिक नेमकेपणाने निर्णय घेता आला. 

तांबे यांच्यासाठी त्यांचे मामा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व तांबे यांचे वडील आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विश्‍वजीत यांच्यासोबत बैठक घेतली. तांबे यांच्यासाठी विखे-पाटील यांचा होकार मिळविणे जिकरीची गोष्ट होती. कदम यांनी ते कामदेखील चोखपणे पार पाडले. त्यानंतर गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण, विखे-पाटील, बाळासाहेब थोरात व हर्षवर्धन पाटील यांची कदम यांच्या पुण्यातील निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत तांबे, झनक यांच्या नावाला अंतिम स्वरूप देण्यात आले. 

प्रदेशाध्यक्ष व कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरवून दिलेल्या चौकटीत झाली. मतदान तीन दिवस चालले. सुमारे एक लाख 17 हजार इतके मतदान झाले. कदम यांनी नोंदणी केलेल्या मतदारांपैकी झालेले सर्व मतदान तांबे व झनक यांच्या पारड्यात टाकली. निवडून आलेल्या कार्यकारिणीतील नावे पाहिली तर कदम यांचाच वरचमष्मा असल्याचे लक्षात येते. तांबे यांच्याशिवाय आमदार अमीत झनक व विदर्भातील कॉंग्रेसचे नेते नितीन राऊत यांचे चिरंजीत कुणाल राऊत हेदेखील इच्छुक होते. मात्र तांबे अध्यक्ष झाल्याने अमीत झनक यांना उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. कुणाल राऊत यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 
 
संबंधित लेख