youth congress | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी  मुंबईत युवक कॉग्रेसचा रेल रोको 

संदीप खांडगेपाटील 
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांच्या संपामुळे वातावरणात सर्वत्र तापलेले असताना या आंदोलनात आता मुंबई युवक कॉंग्रेसनेही उडी घेतली आहे. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी आज घाटकोपर येथे युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुंबईतील चाकरमान्यांचे हाल झाले. 

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांच्या संपामुळे वातावरणात सर्वत्र तापलेले असताना या आंदोलनात आता मुंबई युवक कॉंग्रेसनेही उडी घेतली आहे. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी आज घाटकोपर येथे युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुंबईतील चाकरमान्यांचे हाल झाले. 

संपूर्ण कर्ज माफी आणि शेतमालाला चांगला हमी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातही शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात 5 शेतकरी मृत्युमुखी पडले. शेतकऱ्यांविरोधातील सरकारचा निषेध करण्यासाठी आता कॉंग्रेस रस्त्यावर उतरली आहे. आज (ता.8) दुपारी 1: 30 च्या सुमारास युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घाटकोप येथे रेल रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलनकांनी मोदी सरकारचा निषेध करीच जोरदार घोषणाबाजी केली. 

कार्यकर्त्यानी डोक्‍यावर लाल पट्टी बांधून हातात झेंडे घेऊन रुळावर येऊन रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. युवक कॉंग्रेसने सोशल मीडियावर आधीच आंदोलन करणार असल्याचे सुचवले असल्यामुळे आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी दुपारी 12 वाजल्या पासून रेल्वे स्थानकावर हजेरी लावत कडक पहारा ठेवला होता . युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सीएसटीएमकडे जाणारी रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यानी रुळावर येऊन भाजपा सरकारच्या मनमानी कारभाराचे फलक तसेच मोदी सरकारचा निषेध करत हाय हायच्या घोषणा दिल्या. 

रेल्वे पोलिसांनी युथ कॉंग्रेसचे मुंबई प्रवक्ते सुधांशु भट, अब्राहम राय, अभिषेक सावंत, रितिक जोशी आदीसह 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

मोदी सरकार शेतकरीविरोधी 
युथ कॉंग्रेसचे मुंबई प्रवक्ते सुधांशु भट म्हणाले, की भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. अच्छे दिन म्हणणाऱ्या मोदी सरकारने मध्य प्रदेशात शेतकऱ्यांवर गोळीबार करून शेतकर्त्यांविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. कर्ज मुक्तीसाठी आणि शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी आंदोलनात उतरलेल्या शेतकऱ्याला हे सरकार न्याय देऊच शकत नाही. जो पर्यंत सरकार शेतकऱ्यांना योग्य न्याय देत नाही. तोवर युवक कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन सुरूच राहणार आहे. 

 
 

संबंधित लेख