young man suicide for reservation | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील गल्लेबोरगांव येथील एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (ता. 11) घडली. किशोर शिवाजी हार्दे असे या तरुणाचे नाव असून आरक्षणासाठी आपण जीवन संपवत आहोत अशी चिठ्ठी आत्महत्येपुर्वी त्याने लिहून ठेवली होती. 

खुलताबाद तालुक्‍यातील गल्लेबोरगांव येथील किशोर शिवाजी हार्दे याने आज सकाळी लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतल्यामळे गावात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती कळताच औरंगाबाद येथे बैठकीला आलेले तहसीलदार राहूल गायकवाड यांनी तात्काळ गावात धाव घेतली. गावकऱ्यांची बाजून ऐकून घेऊन त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मृताच्या कुटुंबीयांना दहा लाखाची मदत आणि एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे आश्‍वासन देखील तहसिलदारांनी सरकारच्या वतीने यावेळी दिले. त्यानंतर किशोरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. 

आत्महत्या नव्हे सरकारने केलेला खून 
किशोरने आत्महत्येपुर्वी लिहलेल्या चिठ्ठीत आपण आत्महत्या करत नसून सरकारने केलेला हा खून असल्याच उल्लेख केला आहे. तो नाशिक जिल्ह्यातील येवला येथे एका फायनान्स कंपनीत कामाला होता. पोळा सणासाठी तो सुटीवर गावाकडे आला होता. 
 
संबंधित लेख