You will See May Performance on 23rd May Say Raju Shetty | Sarkarnama

माझ्या बॅटीचा स्कोअर २३ मे रोजी दिसेल : राजू शेट्टी

धर्मवीर पाटील
बुधवार, 10 एप्रिल 2019

हे सरकार शेतकऱ्यास खड्ड्यात घालणार असे म्हणत फिरणारा एक जण मंत्री झाल्यावर मात्र सरकारचे गोडवे गात फिरत असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता केली.वाळवा तालुक्यातील तांबवे, रेठरेधरण येथील सभेत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेख टाळून खासदार राजू शेट्टी यांनी ही टीका केली.

इस्लामपूर : हे सरकार शेतकऱ्यास खड्ड्यात घालणार असे म्हणत फिरणारा एक जण मंत्री झाल्यावर मात्र सरकारचे गोडवे गात फिरत असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता केली.वाळवा तालुक्यातील तांबवे, रेठरेधरण येथील सभेत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेख टाळून खासदार राजू शेट्टी यांनी ही टीका केली.

ते म्हणाले, "पूर्वी ही व्यक्ती हे सरकार शेतकऱ्यास खड्ड्यात घालणार, असे म्हणत होती. मात्र तो मंत्री झाल्यावर सरकारचे गोडवे गात फिरत आहे. मला सत्तेची हाव असती तर मीही सत्तेची ऊब खात बसलो असतो." ते पुढे म्हणाले, "मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला पाडण्याच्या कितीही वलग्ना केल्या तरी जोपर्यंत गोरगरीब, सामान्य माणूस व शेतकरी माझ्यासोबत आहे तोपर्यंत त्यांच्या असल्या वल्गनांना मी भीक घालत नाही. या मंडळींनी आपल्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी माझ्या नावाचाच माणूस उभा करून, त्याला माझे पूर्वीचे चिन्ह दिले आहे; मात्र लोक हुशार आहेत. माझा फोटो, बॅट चिन्ह शोधून मतदान करतील. माझी बॅट किती स्कोअर करते? हे तुम्हाला २३ तारखेला कळेल."

''भाजपाने शेतकऱ्यांना दीडपट  हमीभाव देवू, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देवू, असे आश्वासन दिल्याने आम्ही गेल्या निवडणुकीत त्यांना साथ दिली.  मात्र भाजपने सत्तेवर आल्यानंतर विश्वासघात केला." असेही शेट्टी म्हणाले. माजी आमदार मानसिंग नाईक, सत्यजित देशमुख, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, अँड. विश्वासराव पाटील, आनंदराव पाटील, सयाजी मोरे, संदीप राजोबा, भागवत जाधव, संग्राम पाटील आदी उपस्थित होते.

राजू शेट्टी

संबंधित लेख