You will find only one a place for foolishness & it is congress : Amit Shah | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

सध्या मूर्खपणा करण्यासाठी एकच जागा आहे, ती म्हणजे कॉंग्रेस :  अमित शहा 

पीटीआय
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

'भारत के टुकडे टुकडे गॅंग'ला पाठिंबा द्या, नक्षलवादी, बनावट कार्यकर्ते, भ्रष्टाचारी यांना पाठबळ द्या, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना बदनाम करा...राहुल गांधी यांच्या कॉंग्रेसमध्ये तुमचे स्वागत आहे.

-अमित शहा

 

नवी दिल्ली  : "महाराष्ट्र पोलिसांनी पाच जणांना केलेल्या अटकेमध्ये हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने कॉंग्रेस पक्ष तोंडावर आपटला आहे. सध्या मूर्खपणा करण्यासाठी एकच जागा आहे, ती म्हणजे कॉंग्रेस,'' अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली.

"राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्याचेही राजकारण करण्याइतपत ज्यांनी खालची पातळी गाठली, ते सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे उघडे पडले आहेत. शहरी नक्षलवादाबाबत आपली भूमिका कॉंग्रेसने स्पष्ट करण्याची हीच वेळ आहे,'' असे शहा यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. 

पाच कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य केले होते. त्यावरूनही शहा यांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडले. "मूर्खपणा करण्यासाठी एकच जागा आहे, ती म्हणजे कॉंग्रेस. 'भारत के टुकडे टुकडे गॅंग'ला पाठिंबा द्या, नक्षलवादी, बनावट कार्यकर्ते, भ्रष्टाचारी यांना पाठबळ द्या, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना बदनाम करा...राहुल गांधी यांच्या कॉंग्रेसमध्ये तुमचे स्वागत आहे,'' असा प्रतिटोला शहा यांनी मारला.

 भारत हे जिवंत लोकशाहीचे उदाहरण असून वादविवाद, चर्चा आणि विरोधी भूमिका मांडण्याचा येथे पूर्ण अधिकार आहे. मात्र, नागरिकांना हानी पोचविण्याच्या उद्देशाने देशाविरोधात कट करणे हे यापैकी काहीही नाही. या मुद्याचे राजकारण करणाऱ्यांनी माफी मागायला हवी, अशी मागणीही अमित शहा यांनी केली.

कोरेगाव भीमा दंगलीशी संबंध असल्यावरून महाराष्ट्र पोलिसांनी 28 ऑगस्टला पाच कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली होती.

 "भारतात फक्त एकच एनजीओ आहे, तिला आरएसएस म्हणतात. इतर सर्व एनजीओ बंद करा, सर्व कार्यकर्त्यांना अटक करा, तक्रार करणाऱ्यांना गोळ्या घाला. नव्या भारतामध्ये तुमचे स्वागत आहे,'' अशी तिरकस टीका राहुल यांनी केली होती. अमित शहा यांनी याच चालीत राहुल यांना आज उत्तर दिले.

 

संबंधित लेख