Yogi Replaces Modi on TV nowdays- Kanhaiyya | Sarkarnama

टीव्हीमध्ये आता मोदींच्या जागी योगी - कन्हैय्याकुमार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 एप्रिल 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मी आलो आहे. आता पंतप्रधानही उद्या (ता. 14) येणार असल्याचे समजले. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण झाल्यामुळे दीक्षाभूमीवर यावे लागले

नागपूर - आतापर्यंत इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमांमध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान गायिले जात होते. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीनंतर टीव्हीवर आता योगी आदित्यनाथ यांची आरती ओवाळली जात असल्याची टिप्पणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) छात्रसंघाचा माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार यांनी केली.

कन्हैय्याकुमार यांच्या "बिहार ते तिहार' या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन नागपुरात पार पडले. यावेळी कन्हैय्याकुमार बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य हरीभाऊ केदार यांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवि डॉ. यशवंत मनोहर होते.

गेल्या काही वर्षांपासून टीव्ही चॅनेलमध्ये केवळ "मोदी-मोदी' गुण गायिले जात होते. केव्हाही न्यूज चॅनेल सुरू करा, मोदींचा चेहरा दिसत होता. परंतु उत्तरप्रदेशची विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर यात फरक पडला आहे. आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेच "दर्शन' दररोज आहेत. "उन्होने क्‍या खाया', "उन्होने मंदिर में पूजा की', "उन्होने गय्या को घास खिलायी' अशा बातम्या आता आपल्याला पाहाव्या लागत आहे.

पंतप्रधानांवर टीका करताना कन्हैय्याकुमार म्हणाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मी आलो आहे. आता पंतप्रधानही उद्या (ता. 14) येणार असल्याचे समजले. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण झाल्यामुळे दीक्षाभूमीवर यावे लागले हा डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संबंधित लेख