Yogi Aditynath orders closure of illegal abbotiors in UP | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले
राहुल गांधी पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर
पुणे : पहिल्या फेरित एनडीए तीनशे जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रायबरेलीत सोनिया गांधी आघाडीवर आहेत
दक्षिण मध्य मुंबईत पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर...

कत्तलखाने बंद करण्याचे योगींचे आदेश

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

प्रचारादरम्यान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील उत्तर प्रदेशात सत्तेत येताच कत्तलखाने बंद करू, असे म्हटले होते.  आज योगी आदित्यनाथ यांनी याबाबत पोलिसांना कडक कारवाईचे आदेश देत समाज-विघातक शक्तींविरुद्धही कठोर राहावे, असे म्हटले आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे आपला शब्द पाळत आज उत्तर प्रदेशातील सर्व कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिले. राज्यातील कत्तलखाने बंद करण्यासाठी 'अॅक्‍शन प्लॅन' तयार करण्याच्या सूचना आज पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गायींच्या तस्करीवरही संपूर्ण बंदी घालावी आणि याबद्दल कोणतीही सबब खपवून घेतली जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, लखनौ महानगर पालिकेने या आदेशाचे पालन करत येथील नऊ मांस दुकानांना टाळे ठोकले आहे. नेमके कोणते कत्तलखाने बंद करणार हे नमूद केले नसले तरी, भाजपच्या जाहीरनाम्यात अवैध कत्तलखान्यांवर बंदी आणू, असे म्हटले असल्याने त्यांच्यावरच कारवाई सुरु झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. शहरात सुमारे 200 ते 250 मांस दुकाने ही अवैधरित्या सुरू असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा पडणार आहे. येथे होणाऱ्या गायींच्या तस्करीमुळे डेअरी उद्योगाचा विकास होत नसल्याचे मतही भाजपने व्यक्त केले आहे.

प्रचारादरम्यान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील उत्तर प्रदेशात सत्तेत येताच कत्तलखाने बंद करू, असे म्हटले होते.  आज योगी आदित्यनाथ यांनी याबाबत पोलिसांना कडक कारवाईचे आदेश देत समाज-विघातक शक्तींविरुद्धही कठोर राहावे, असे म्हटले आहे.

आदित्यनाथ यांनी आज पोलिसांना महामार्गावर रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोऱ्या आणि लुटीचे प्रकार थांबविण्याचेही निर्देश दिले आहेत. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेट्रोलिंगवर लक्ष ठेवावे असेही आदित्यनाथ यांचे आदेश आहेत.

वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आदित्यनाथ यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असे सांगितले. पक्षाचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी ही माहिती देताना आदित्यनाथ यांनी पुढील पाच वर्षासाठीचा आराखडाही तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.

संबंधित लेख