yogi adityanatha | Sarkarnama

"ईव्हिएम' म्हणजे "एव्हरी व्होट मोदी': योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

गोरखपूर : दिल्लीतील महापालिका निवडणुकीत मतदारांनी मतपेटीतून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जे काही उत्तर द्यायचे आहे ते दिले आहे. ईव्हिएम' म्हणजे "एव्हरी व्होट मोदी' हे मतदारांनी खरे करून दाखविले आहे. त्यामुळे जे कोणी मतदान यंत्रावर शंका घेतात त्यांना चोख उत्तर मिळाले आहे अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केली. 

गोरखपूर येथे पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना योगी यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत मायावती, अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ""उत्तरप्रदेशमध्ये भाजप स्वबळावर सत्तेवर आल्यापासून केजरीवाल हे आमच्यावर मतदान यंत्रातील घोळामुळे विजय मिळाल्याचे सांगत आहेत. पंजाब आणि गोव्यातही त्यांच्या पक्षाने मार खाल्यानंतर तर ते अधिकच अस्वस्थ झाले आहेत. आता तर त्यांच्या दिल्लीतीलच महापालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. तरीही ते दोष मतदान यंत्रालाच देत आहे.ईव्हीएम मशिन नव्हे तर "इव्हरी व्होट मोदी' हे मतदारांनी ठरवून टाकले आहे. त्यामुळे केजरीवाल आणि मायावती हे काहीही टीका करीत असले तरी मतदार त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. ते मोदींच्या मागे ठामपणे उभे आहेत हे प्रत्येक निवडणुकीत दिसून आले आहे. '' 

उत्तरप्रदेशातही लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकीला सामोरे जाताना भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले निर्णय आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचवावीत. सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहितीही मतदारांपर्यंत पोचवाव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

संबंधित लेख