yogi adityanath, attack on rahul gandhi, lakhnau | Sarkarnama

युवराजांना गोरखपूर हा पिकनिक स्पॉट वाटतो

वृत्तसंस्था
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर प्रकरणावरून आज (शनिवार) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. 'दिल्लीत एक 'युवराज' बसतो. त्याला स्वच्छता अभियानाचे महत्व माहिती नाही. त्याला गोरखपूर हा पिकनिक स्पॉट वाटतो. या युवराजाला गोरखपूरचा पिकनिक स्पॉट बनविण्याची परवानगी द्यायची काही एक गरज नाही,' अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी राहुल यांच्या प्रस्तावित गोरखपूर दौऱयाला विरोध दर्शविला.

गोरखपूरच्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनअभावी 70 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला होता. राहुल गांधी यांनी या हॉस्पिटलला भेट देण्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी हल्लाबोल केला आहे.

आदित्यनाथ यांनी आजच 'स्वच्छ उत्तर प्रदेश...स्वस्थ उत्तर प्रदेश' योजनेचा गोरखपूरमधून प्रारंभ केला. या योजनेच्या प्रारंभासाठी गोरखपूरची निवड करण्यामागे नुकतीच झालेल्या दुर्घटनेचा संदर्भ मानला जात आहे.

आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात आधीच्या समाजवादी पक्ष- बहूजन समाज पक्षाच्या सरकारांना दोषी धरले. या सरकारांनी राज्यातील वैद्यकीय सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. 'आमचे सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. जनतेने या प्रयत्नांना साथ द्यावी. उत्तर प्रदेश हागणदारीमुक्त करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत,' असे आवाहन त्यांनी केले.  

बालकांच्या मृत्यूला तीव्र मेंदूज्वर कारणीभूत ठरल्याचा दावा आदित्यनाथ सरकारने केला आहे. राज्यातून मेंदूज्वराचे उच्चाटन करण्याची मोहिम म्हणून 'स्वच्छ उत्तर प्रदेश...स्वस्थ उत्तर प्रदेश' योजनेकडे सरकार पाहात आहे. आदित्यनाथ यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा प्रतिनिधित्व केले आहे. बालकांच्या मृत्यूने राज्याची मलीन होऊ पाहात असलेली प्रतिमा सावरण्यासाठी त्यांनी मेंदूज्वरग्रस्त आणि पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे.

संबंधित लेख