yogi adityanath | Sarkarnama

"प्रदेश मे रहना है तो योगी योगी कहना है!'

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

मेरठ : "उत्तर प्रदेशात राहायचे असेल तर 'योगी योगी' म्हणा' अशा आशयाचे वादग्रस्त पोस्टर्स येथील हिंदू युवा वाहिनीच्या जिल्हा समितीने प्रसिद्ध केले आहे. ही पोस्टर्स जिल्हा आयुक्त, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळही लावण्यात आली आहेत.त्यामुळे योगी सरकारवर टीका करण्याची आणखी एक संधी विरोधकांना मिळाली आहे. 

या पोस्टर्सवर पंतप्रधान, योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरच युवा ब्रिगेडच्या जिल्हा समितीचे प्रमुख नीरज शर्मा पांचाली यांचेही छायाचित्र आहे. 'प्रदेश में रहना है तो योगी योगी कहना है' असा मजकूरही यावर छापण्यात आला आहे. या वादग्रस्त पोस्टर्सबाबत स्थानिक गुप्तचर विभागाला सविस्तर अहवाल देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक जे.रवींद्र गौर यांनी दिली. तपासाचा अहवाल मिळाल्यानंतरच आम्ही याबाबत गुन्हा दाखल करून कारवाई करू, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 

याबाबत युवा वाहिनीचे सदस्य नागेंद्र प्रताप सिंह यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, की पांचाली यांची महिनाभरापूर्वीच पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून, ते संस्थेला बदनाम करण्यासाठी असे कृत्य करीत आहे.  

संबंधित लेख