योग लोकांना जोडण्याचे काम करतो : नरेंद्र मोदी 

योग लोकांना जोडण्याचे काम करतो : नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली : 'योग लोकांना जोडण्याचे काम करतो.आज भारतीयांसाठी अभिमानाचा व गर्वाचा क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

चौथ्या जागतिक योगदिनी भारतासह जगभरातील लोक पहाटेपासूनच योगांची प्रात्यक्षिके करत योगदिन साजरा करत आहेत. नरेंद्र मोदींनीही डेहराडूनच्या एका कार्यक्रमात सूर्यनमस्कार व योग करत योगदिन साजरा केला. आज भारतातही या दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

योग आयुष्याला समृद्ध करतो, मानसिक तणाव दूर करायला मदत करतो, भेदभाव होणाऱ्या गोष्टी जेव्हा वरचढ ठरतात, त्यावेळी सामाजात तणाव पसरतो, सर्व ठिकाणी फूट पडू लागते, अशा वेळी योग अत्यंत उपयुक्त ठरतो असही मोदी यांनी म्हटले आहे. 

मोदी डेहराडूनच्या वन संशोधन संस्थेतर्फे आयोजित योगदिना मोदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात 50 हजार लोक सहभागी होते. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com