नगरमध्ये गणेशविसर्जनासाठी 'यिन' सदस्य पोलिसांना मदत करणार

या वर्षीही 'यिन'चे तीनशे सदस्य नगर व भिंगार येथील विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या बरोबरीने काम करतील. स्वयंसेवकाच्या भूमिकेतून ही जबाबदारी 'यिन' सदस्य पार पाडणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व 'सकाळ'चे निवासी संपादक अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांच्यासह संबंधितांच्या उपस्थितीत पोलिस अधीक्षकांच्या दालनात झालेल्या बैठकीत या अभिनव उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.
नगरमध्ये गणेशविसर्जनासाठी 'यिन' सदस्य पोलिसांना मदत करणार

नगर : शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक आणि भिंगारमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे (यिन) तीनशे सदस्य पोलिसांना बंदोबस्तासाठी मदत करणार आहेत. उपक्रमात सहभागी होणाऱ्या 'यिन' सदस्यांना पोलिसांतर्फे बंदोबस्ताचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये स्थापन झालेल्या 'यिन'च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत, यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये 'यिन'च्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. त्याची मोठी चर्चा होऊन होऊन, निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढता राहिला.

याशिवाय आरोग्य, शिक्षण, प्रशिक्षण, पर्यावरण आदी विविध क्षेत्रांमध्येही 'यिन'च्या माध्यमातून नगर जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून 'यिन'चे सदस्या पोलिसांना गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्तात मदत करीत आहेत. मिरवणुकीत मार्गातील वाहतूक व्यवस्थापन, महिला, वृद्ध व मुलांना मदत आदी कामांमध्येही 'यिन'च्या सदस्यांनी बजावलेल्या भूमिकेबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबरोबरच समाजातील विविध स्तरांमधून 'यिन'चे कौतुक झाले आहे. नगरचे न्यू आर्टस महाविद्यालय, छत्रपती इंजिनिअरिंग कॉलेज, सीएसआरडी, विश्‍वभारती इंजिनिअरिंग कॉलेजमधील 'यिन' सदस्यांचा या कामात नेहमीच सहभाग राहिला आहे.

या वर्षीही 'यिन'चे तीनशे सदस्य नगर व भिंगार येथील विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या बरोबरीने काम करतील. स्वयंसेवकाच्या भूमिकेतून ही जबाबदारी 'यिन' सदस्य पार पाडणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व 'सकाळ'चे निवासी संपादक अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांच्यासह संबंधितांच्या उपस्थितीत पोलिस अधीक्षकांच्या दालनात झालेल्या बैठकीत या अभिनव उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. नगर शहर विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच या उपक्रमात सहभागी होणाऱ्या यिन सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

'यिन'ची मदत मोलाची : शर्मा
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असतो. विसर्जन मिरवणुकीपर्यंत तो कायम असतो. पोलिसांच्या सध्याच्या मनुष्यबळाच्या कमतरतेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांना बंदोबस्ताच्या कामात सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या तब्बल तीनशे स्वयंसेवकांची मिळणार असलेली मदत मोलाची व उपयुक्त ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com