धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन भारिप बहुजन महासंघातर्फे साजरा 

धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन भारिप बहुजन महासंघातर्फे साजरा 

येवला : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथे केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा 83 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी भारीप- बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या "एकच साहेब, बाळासाहेब' घोषणा चर्चेचा विषय ठरला. 

दरवर्षी हा दिवस येवल्यात मुक्तीभूमी येथे साजरा होतो. राज्यभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे दाखल होत असतात. यावेळी बोलताना मीराताई आंबेडकर म्हणाल्या, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांनी येथे धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा करून जगाला समतेचा संदेश दिला. बौद्ध असल्याची जाणीव सर्वांनी ठेवून बौद्ध धम्माचे काटेकोरपणे पालन करावे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी तमाम आंबेडकरी जनतेने जातीवादी शक्तींना धडा शिकविण्यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप- बहुजन महासंघाच्या पाठीमागे उभे राहावे. 

ज्येष्ठ नेते डी. एम. उबाळे, राज्याचे बौद्ध महासभेचे अध्यक्ष यू. डी. बोराडे, ज्येष्ठ नेते रूपवते, भारिप- बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, आगवणे काका, अनिकराव गांगुर्डे, भिवानंद काळे आदी उपस्थित होते. 

भुजबळांकडून अभिवादन 
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. मुक्तिभूमीवरही भुजबळ यांनी भेट देऊन महामानवास अभिवादन केले. आमदार पंकज भुजबळ, राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, प्रकाश वाघ, बाळासाहेब लोखंडे, सुभाष गांगुर्डे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com