yedyyyurppa wlll be sworn tomorrow | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

येडियुरप्पाच होणार मुख्यमंत्री! राज्यपालांचे भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 मे 2018

बेंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी अखेर भाजपचेच नेते बी. एस. येडीयुरप्पा हे उद्या सकाळी साडे नऊ वाजता शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.

याबाबत राजभवनकडून आधी अधिकृत घोषणा झाली नाही. भाजप अामदार सुरेशकुमार यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मात्र या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले.

भारतीय जनता पक्षाकडे १०४ आमदार आहे. त्यांना बहुमतासाठी आणखी आठ आमदारांची आवश्यकता आहे. उर्वरीत आठ आमदारांचा पाठिंबा कसा मिळविणार, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. काॅंग्रेस आणि जनता दलाच्या नेत्यांना राज्यपालांनीही भेटही आज दिवसभरात दिली नाही. या दोन्ही पक्षांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे ११६ आमदार आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेची प्रथम संधी त्यांना द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली होती. 

राज्यपालांनी भाजपचे एजंट म्हणून काम पाहू नये, अशी टीका काॅंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी केली होती. मात्र राज्यपालांनी या टिकेकडे दुर्लक्ष करत भाजपलाच सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले.

संबंधित लेख