खेळ खल्लास, येडिंचा राजीनामा 

खेळ खल्लास, येडिंचा राजीनामा 

बंगळुरू : कर्नाटकात येडियुरप्पांचा सत्ता स्थापनेचा खेळ खल्लास झाला असून त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकाच्या इतिहासात तीन दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर नावावर नोंद केली जाईल. कॉंग्रेस-जेडीयूने भाजपला जशास तसे उत्तर देत सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले आहे. 

दरम्यान, बहुमताला सामोरे जाण्यापूर्वी येडिीयुरप्पा यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्षांची भेटही घेतली. 

येडियुरप्पांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकातील सत्ता संघर्ष संपला नसून खरा संघर्ष आता सुरू आहे. कॉंग्रेस आणि जेडीयूचे काही आमदार भाजपच्या आमिषाला बळी पडले होते. ते आज पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यावेळीच भाजप बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते. आज सकाळपासूनही भाजपने बहुमत कसे सिद्ध करता येईल यासाठी प्रयत्न केले मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. बहुमत सिद्ध होत नाही हे लक्षात येताच येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याचा मार्ग स्वीकारला. 

देशात मोदी सत्तेवर आल्यापासून भाजपने प्रत्येक विधानसभा निवडणुकीत यश खेचून आणले आहे. देशातील 21 राज्यात भाजपची सत्ता आली आहे. कॉंग्रेसला काही ठिकाणी बहुमत मिळूनही भाजपने सामदामदंडाचा वापर करून कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र कॉंग्रेसने भाजपची ही खेळी ओळखून आपलाही पत्ता उघडला आणि निकाल येतात देवेगौडांच्या पक्षाला पाठिंबा देऊन पहिली लढाई जिंकली होती. राज्यपालांनी येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत देताच कॉंग्रेसने न्यायालयात धाव घेतली. 

शेवटी कॉंग्रेसच्या या प्रयत्नांना यश आले. बहुमत सिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने दिले त्यानुसार आज बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान येडियुरप्पा यांच्यावर होती. मात्र विधानसभेत ते बहुमत सिद्ध करण्यापूर्वी सत्ता सोडावी लागली. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने आता राज्यपालांना कुमारस्वामींना आता निमंत्रण द्यावे लागेल. त्यामुळे कुमारस्वामी नवे मुख्यमंत्री होतील आणि त्यांना कॉंग्रेसचा पाठिंबा असेल. 

कर्नाटकाचे राजकारण देशाच्या राजकारणाचे चित्र बदलेल असे येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर बोलले जात आहे. कर्नाटक विधानसभेच्या गॅलरीत भाजप नेते अनंतकुमार, मल्लिकार्जुन खरगे,गुलामनबी आझाद,अशोक गेहलोत आदी उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com