This year my father is not there ... Vishwajeet Kadam | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

या दिवाळीला पप्पा नाहीत  ... विश्वजीत कदम  

संपत मोरे  
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पतंगराव कदम दरवर्षी त्यांच्या सोनसळ गावात जाऊन दिवाळी साजरी करायचे. यावर्षी त्यांच्या सोनहिरा खोऱ्यात दिवाळीचे वातावरण दिसत नाही.

 पुणे : "या दिवाळीला पप्पा नाहीत आम्ही दिवाळीचा दिवा लावणार नाही,गेल्या वर्षीची त्यांच्यासोबतची दिवाळी आठवते."अशा शब्दात आमदार विश्वजित कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पतंगराव कदम दरवर्षी त्यांच्या सोनसळ गावात जाऊन दिवाळी साजरी करायचे, यावेळी त्याना भेटायला लोकांची गर्दी असायची. यावर्षी त्यांच्या सोनहिरा खोऱ्यात दिवाळीचे वातावरण दिसत नाही.

श्री . कदम म्हणाले,"पप्पा कोठेही असले तरी दिवाळीला गावी जायचे.तिथं ते कार्यकर्त्यांसोबत दिवाळी साजरी करायचे.आता पप्पा नाहीत.मला गेल्या दिवाळीच्या आठवणी येत आहेत. आमचे कुटुंब यावर्षी दिवाळी साजरी करणार नाही.दिवा लावणार नाही."

"गरीब माणसाच्या चेहऱ्यावर आनंद बघणे हीच पप्पासाठी दिवाळी असायची.सामान्य माणसासाठी काम करत राहणे त्याना आनंदी बघणे यासाठीच काम करण्याचा संकल्प या दिवाळीला करतोय."
 

संबंधित लेख