यवतमाळ जिल्हा बॅंकेची परीक्षा ऐनवेळी रद्द : संतप्त उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

यवतमाळ जिल्हा बॅंकेची परीक्षा ऐनवेळी रद्द : संतप्त उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बहुप्रतिक्षेत भरती प्रक्रियेअंतर्गत आज लिपिकपदासाठी लेखी परीक्षा होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरच आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा बॅंकेची कर्मचारी भरतीप्रक्रिया नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. यंदाही बॅंकेच्या भरतीप्रक्रियेवरून बरीच उलटसुलट चर्चा होत आहेत. त्यातच आज
लिपिकपदाची परीक्षा वेळेवर रद्द करण्यात आल्याने राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची तारांबळ उडाली. या परीक्षेसाठी पुणे, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने उमेदवार आलेले होते. वेळेवर परीक्षा रद्द
झाल्याने संप्तप उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रवासभाडेजिल्हा बॅंकेकडून मिळण्याची व यानंतरच्या परीक्षेची माहिती चार दिवसांपूर्वी देण्याची मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com