yavatmal and president | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या मुली राष्ट्रपतींना पाठविणार 1 लाख पत्रे

चेतन देशमुख
सोमवार, 16 एप्रिल 2018

यवतमाळ : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची दखल घेत नाही त्याचबरोबर दोन्ही सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने या धोरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रपतींना 1 लाख पत्रे पाठविण्याचा निर्धार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलींनी केला आहे. 

यवतमाळ : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची दखल घेत नाही त्याचबरोबर दोन्ही सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने या धोरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रपतींना 1 लाख पत्रे पाठविण्याचा निर्धार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलींनी केला आहे. 

घाटंजी तालुक्‍यातील राजूरवाडी येथील शंकर चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या करूनही राज्य सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. आत्महत्येपूर्वी या शंकर चायरे या शेतकऱ्याने लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे नमूद केले होते. तरीही राज्य सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. तब्बल तीन दिवस या शेतकऱ्याचे शवविच्छेदनही होऊ शकले नाही. यामुळे निराश झालेल्या या शेतकऱ्याची मुलगी जयश्री चायरे हिने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठविले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळला येण्याचे टाळून दौरा रद्द केला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियाला भेटण्याचे सौजन्यही मुख्यमंत्र्यांनी दाखविले नाही. राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आता ही मोहिम पुढील एक महिना राबविली जाणार असल्याचे जयश्री चायरे हिने "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुली राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविणार आहेत. जयश्री चायरे हिने राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रात माझ्या वडिलांच्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोपाचा पुनरुच्चार केला आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांच्या मुलींनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीची माहिती राष्ट्रपतींना व्हावी, हा उद्देश या पत्र मोहिमेमागे आहे. या मोहिमेत जास्तीतजास्त मुलींनी सहभागी व्हावे, यासाठी यवतमाळ जिल्ह्यात फिरणार असल्याचे जयश्री चायरे हिने सांगितले. 
 

संबंधित लेख