yashwantrao gadhakh | Sarkarnama

आजचा वाढदिवस : यशवंतराव गडाख, माजी खासदार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 मे 2018

नगरच्या राजकीय व साहित्यिक क्षेत्रातही आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे यशवंतराव गडाख. सोनई (ता. नेवासे) हे त्यांचे गाव. मुळा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, दोन वेळा आमदार, तीन वेळा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशा पदांवर काम करताना त्यांनी नेवासे तालुक्‍याचा कायापालट केला. पंचायत समितीचे सभापतिपद, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक, राज्य सहकारी बॅंकेचे संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषविली. गडाख यांनी प्रारंभी शिक्षकी पेशा पत्करला होता. साहित्य क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले असून, "अर्धविराम' या त्यांच्या आत्मचरित्रपर ग्रंथाचे राज्यात अनेकांनी कौतुक केले.

नगरच्या राजकीय व साहित्यिक क्षेत्रातही आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे यशवंतराव गडाख. सोनई (ता. नेवासे) हे त्यांचे गाव. मुळा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, दोन वेळा आमदार, तीन वेळा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशा पदांवर काम करताना त्यांनी नेवासे तालुक्‍याचा कायापालट केला. पंचायत समितीचे सभापतिपद, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक, राज्य सहकारी बॅंकेचे संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषविली. गडाख यांनी प्रारंभी शिक्षकी पेशा पत्करला होता. साहित्य क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले असून, "अर्धविराम' या त्यांच्या आत्मचरित्रपर ग्रंथाचे राज्यात अनेकांनी कौतुक केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. 1982 मध्ये नगर येथे दलित साहित्य संमेलन भरवून त्यांनी राज्यात नवा पायंडा पाडला. साहित्य चळवळीतील त्यांनी केलेले भरीव काम जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

संबंधित लेख