women politics challenges | Sarkarnama

बायांनो, राजकारणात यायचंय तर भांडू नका ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

महिलांना प्रत्येक क्षेत्रात वाढलेली संधी पाहता आगामी काळात राजकारणातही चांगले दिवस आहेत. त्यामुळे ही संधी महिलांनी सोडू नये. राजकारणातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी आता पुढे यावे. आपला आदर्श इतरांना घेता येईल, असे काम करून दाखवावे. कुणी आपल्या चारित्र्यावर शिंतोडेही उडविणार नाहीत, यासाठी स्वतःला सावरले पाहिजे. असा सूर महिलांच्या राजकीय कार्यशाळेत उमटला.

नगर : महिलांना प्रत्येक क्षेत्रात वाढलेली संधी पाहता आगामी काळात राजकारणातही चांगले दिवस आहेत. त्यामुळे ही संधी महिलांनी सोडू नये. राजकारणातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी आता पुढे यावे. आपला आदर्श इतरांना घेता येईल, असे काम करून दाखवावे. कुणी आपल्या चारित्र्यावर शिंतोडेही उडविणार नाहीत, यासाठी स्वतःला सावरले पाहिजे. असा सूर महिलांच्या राजकीय कार्यशाळेत उमटला. "बायांनो, राजकारणात यायचं, तर भांडू नका' असा सल्ला ज्येष्ठ राजकीय महिलांनी नवोदितांना दिला. 

सकाळ सोशल फाउंडेशन व तनिष्का व्यासपीठ यांच्यावतीने शनिवारी नगरमध्ये "महिलांना राजकारणात काम करताना येणाऱ्या अडचणी' या विषयावर कार्यशाळा झाली. त्यावेळी सर्व पक्षातील महिलांची उपस्थित होती. या वेळी महापौर सुरेखा कदम, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभागाच्या सभापती अनुराधा नागवडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, कॉंग्रेसच्या निर्मला मालपाणी, सामाजिक कार्यकर्त्या गिता गिल्डा, आंतरराष्ट्रीय ज्युदो पटू अंजली देवकर, ऍड. अनिता दिघे तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. "सकाळ'चे निवासी संपादक डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी स्वागत करून "सकाळ'च्या उपक्रमांची माहिती दिली. 

महिलांनी मांडलेले मुद्दे : 
*राजकारणात येताना महिलांनी स्वतःच्या कुटुंबाकडे आधी लक्ष द्यावे
*कुटुंबातील सर्वांचे चांगले सहकार्य हवे
*स्वतःच्या चारित्र्य जपवणूक करीत आदर्श निर्माण करावा
*पक्षासाठीच नव्हे, तर स्वतःच्या कतृत्त्वासाठीही काम करावे
*राजकारणातील महिलांविषयीची स्वतःची प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न करावेत
*एकमेकींचे पाय ओढणे थांबवावे
*पक्षांतर्गत वादाचे वैयक्तिक भांडणात रुपांतर नको
*सामाजिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी वाचन महत्त्वाचे
*कायद्याचे ज्ञान हवे
*भारतीय संस्कृतीला साजेसा स्वतःचा पेहराव हवा
*अनावश्‍यक मेकअप नको
*इतरांचे अनुकरण नको
*चांगल्या कामात पक्षीय भेदभाव नको
*सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करा
*"चूल-मूल'मधून बाहेर पडण्याची वेळ 
 

संबंधित लेख