Wish to Fight from Madha Constituencey says Prabhakar Deshmukh | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मी माढ्यातून इच्छुक, पक्षाने योग्य निर्णय घ्यावा : प्रभाकर देशमुख 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

सातारा शासकीय विश्रामगृहात खटाव तालुका दुष्काळातून वगळल्याबाबत प्रशासन व शासनाचे काय चुकले याबाबतचे मत मांडण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्हाला लोकसभा आवडते की विधानसभा असे विचारले होते. त्यावेळी त्यांनी लोकसभा असे उत्तर दिले

सातारा : ''माढाच्या विद्यमान खासदारांना माझा विरोध नाही. पण माझा कामातील अनुभव विचारात घेता मी येथून लोकसभेसाठी इच्छुक आहे. याबाबत मी माझी बाजू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मांडली आहे. आता पक्ष योग्य तो निर्णय घेईल,'' असे प्रतिपादन मत माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी येथे केले. 

सातारा शासकीय विश्रामगृहात खटाव तालुका दुष्काळातून वगळल्याबाबत प्रशासन व शासनाचे काय चुकले याबाबतचे मत मांडण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्हाला लोकसभा आवडते की विधानसभा असे विचारले होते. त्यावर ते म्हणाले, "साहजिकच मला लोकसभा आवडते. मी लोकसभेसाठी इच्छूक आहे. कारण येथील योजना व त्यासाठी असलेला मोठ्याप्रमाणातील निधी उपलब्ध होतो. तसेच शासनाच्या धोरणात्मक निर्णयात सहभागी होऊन चांगले निर्णय घेता येऊ शकतात. मनरेगामध्ये काही त्रुटी होत्या. याबाबत मी खासदार सुप्रिया सुळे यांना ही बाब लक्षात आणून देऊन त्यांना हा प्रश्‍न लोकसभेत मांडण्याची विनंती केली होती. त्यांनी तो विषय मांडल्याने त्या त्रुटी दूर होऊ शकल्या."

ते पुढे म्हणाले, "आजपर्यंत मी केलेल्या कामाचा अनुभव विचारात घेऊन तसेच लोकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन पक्षाने याबाबत विचार करावा. माझा विद्यमान खासदारांना कोणताही विरोध नाही. पण मी माझी बाजू राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापुढे मांडली आहे. त्यामुळे पक्ष योग्य तो निर्णय घेईल. शरद पवारांशी तुमचे याबाबत काही बोलणे झाले आहे का, यावर ते म्हणाले की, मी वरती काम करण्यासाठी इच्छुक असल्याची पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. 

खटाव तालुक्‍याला दुष्काळातून वगळण्यात आले आहे. याबाबत ते म्हणाले, दुष्काळ जाहीर करताना तालुका निकष धरून घेतलेला निर्णय चुकीचा आहे. गावांचा विचार करून निकष लावायला हवा होता. एकुणच प्रशासकिय यंत्रणेवर मंत्र्यांचा विश्‍वास नसल्याचे दाखवून नवीन निकष तयार केले गेले आहेत. हे निकष बदलावेत अन्यथा भविष्यात मोठ्या आपत्तीला आपल्याला सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रभाकर देशमुख यांनी दिला. 

संबंधित लेख