will win khadkwasala assembly : NCP | Sarkarnama

खडकवासला जिंकण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार

ज्ञानेश सावंत
सोमवार, 11 जून 2018

पुणे : पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येईल, इतपत पक्षाची ताकद आहे. पण, इच्छुकांची संख्या आणि गटबाजीमुळे आमचा उमेदवार पराभूत होतो, अशी कबुली देतानाच आगामी निवडणूक एकदिलाने लढू. या मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा रोवू, असा निर्धार राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी रविवारी व्यक्त केला.

लोकसभेलाही सर्व गटतट विसरून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधानसभेला राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या खडकवासल्याती राजकीय चित्र बदलण्याची आशा तुर्तास तरी आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त "सरकारनामा' फेसबुक लाईव्हमधील चर्चासत्रात पक्षाचे स्थानिक नेते सुभाष जगताप, नगरसेवक विशाल तांबे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर सहभागी झाल्या होत्या. पक्षाची वाटचाल, अतर्गंत राजकारण आणि शहर विकासाच्या मुद्यांवर चर्चा झाली. तेव्हा, राष्ट्रवादीत पक्षांतर्गंत राजकारण खडकवासल्यात पक्षाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी मान्य केले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघातील खडकवासल्यात राष्ट्रवादीची ताकद आहे. परंतु, इच्छुकांमधील चढाओढीमुळे ऐन विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद कमी होते. त्याचा परिणाम भाजपचे वर्चस्व वाढत गेले. या पार्श्वभूमीवर गेल्या काही निवडणुकांमधील चुका दुरुस्त करून एकत्र येऊन निवडणूक जिंकण्याचा इरादा जगताप, तांबे आणि चाकणकर यांनी केला.

जगताप म्हणाले, "योजनांच्या नावाखाली भाजप पुणेकरांची लूट करीत आहे. बहुतांशी प्रकल्पांच्या माध्यमातून लाखो रुपये नेत्यांच्या खिशात घातले जात आहेत. निविदांचे आकडे फुगविण्यात येत आहे. त्यामुळे पुण्याचा विकास नव्हे तर, लुबाडणूक सुरू आहे. विरोधकांना सत्ताधारी जुमानत नाहीत. भाजपला सत्ता राबविता येत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नेहमीचा विकासाचा अजेंडा राबविला आहे.''

""जुन्या योजना मांडून विकास करीत असल्याचे भाजप दाखवून देत आहे. राष्ट्रवादीच्या काळात मात्र, पारदर्शक कारभार होता. भाजपचा खरा चेहरा पुणेकरांसमोर आला आहे. खडकवासल्यात आम्ही सगळीजण एकत्र येऊन काम करू. ज्यामुळे पक्षाचा उमेदवार निवडून येईल. पक्ष नेतृत्व ज्याला उमेदवारी देईल, त्यांच्यासाठी काम करू,'' असे तांबे यांनी सांगितले. 

संबंधित लेख