Will Raju Shetty & Prakash ambedkar join handsfor Lok Sabha ? | Sarkarnama

राजू  शेट्टींच्या स्वाभिमानीचे शेतकरी आणि प्रकाश आंबेडकरांच्या  भारिपचे कष्टकरी एकत्र येतील काय ? 

अरूण जैन
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

बुलडाणा  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांच्यातर्फे  प्रकाश आंबेडकर यांच्या  भारिप बहुजन महासंघाशी काही मतदारसंघात राजकीय ऍडजेस्टमेंट करता येईल का याबाबत चाचपणी सुरु असल्याचे वृत्त आहे . 

बुलडाणा  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांच्यातर्फे  प्रकाश आंबेडकर यांच्या  भारिप बहुजन महासंघाशी काही मतदारसंघात राजकीय ऍडजेस्टमेंट करता येईल का याबाबत चाचपणी सुरु असल्याचे वृत्त आहे . 

प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या नावाखाली संघर्ष अभियान सुरू केले आहे. यामध्ये आदिवासी, धनगर यांच्यासह समाजातील दुर्लक्षित घटकांना एकत्रित करून जनजागृती सुरू केली आहे. त्याला ब-यापैकी प्रतिसादही मिळत आहे.   खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सरकारशी गंभीर मतभेद झाल्याने वर्षभरापासून भाजपपासून दूर गेले आहेत .   त्यांनी काॅग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबर  जवळिक सुरू केली आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या भूमिकेतूनही हा प्रयत्न असू शकतो. 

परंतु या दोन्ही काॅग्रेससोबत आघाडी होण्यासाठी अनेक समिकरणे जुळवून येणे आवश्यक राहणार आहे. पहिली बाब म्हणजे स्वाभिमानीची ताकद  बुलडाणा, माढा, वर्धा आणि खासदार शेट्टीच्या हातकणंगले  मतदारसंघात जास्त आहे. विदर्भात अकोला आणि अन्य काही जिल्ह्यात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव रविकांत तुपकर आणि इतरांच्या प्रयत्नातून वाढत चाललेला आहे .

त्यामुळे हा पक्ष सहाजिकच किमान  चार-पाच लोकसभेच्या जागा  जागा मागेल हे निश्चित. आहे . अशावेळी नेमकं जागांवर घोडं अडल्यास शेट्टींना दुसरा पर्याय पाहावा लागणार आहे. अशावेळी या पक्षासाठी प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघाची हा पर्याय  ठरू शकेल काय याची चाचपणी स्वाभिमानीतर्फे सुरु आहे . 

यादृष्टीने काही हालचाली लवकरच सुरू होतील. शिवाय आंबेडकरांनाही काॅग्रेससोबत जाण्यात फारसे स्वारस्य नसल्याचे त्यांच्या अलिकडच्या काही विधानामुळे वाटते. संघर्ष यात्रेदरम्यान त्यांनी दररोज वेगवेगळी विधाने करून आघाडीसोबत जाण्यापेक्षा वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतली आहे. 

अशावेळी काॅग्रेस-राष्ट्रवादीचे दोघांशीही पटले नाही तर स्वाभिमानीचे शेतकरी आणि भारिपचे कष्टकरी एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले तर नवल वाटायला नको !

संबंधित लेख