मी शिवसेनेत जाणार नाही : संग्राम जगताप

मागील आठवड्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भेट घेतली व ते शिवसेनेत जाणार, अशी पोस्ट सोशल मीडियावर (सरकारनामा नव्हे) व्हायरल झाली होती.याचा जगताप यांनी आज साफ शब्दात इन्कार केला
मी शिवसेनेत जाणार नाही : संग्राम जगताप

नगर : ''माझी व शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांशी भेट झालेली नाही. आणि मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. कुणीतरी सोशल मीडियावर वावड्या उठवल्या आहेत,'' असे स्पष्टीकरण आमदार संग्राम जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

मागील आठवड्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भेट घेतली व ते शिवसेनेत जाणार, अशी पोस्ट सोशल मीडियावर (सरकारनामा नव्हे) व्हायरल झाली होती. याबाबत आमदार जगताप यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, ''मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. माझी व कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याची भेट झालेली नाही. काही बोलणेही झालेले नाही. असे असताना सोशल मीडियावर कुणीतरी पोस्ट टाकून वातावण ढवळले आहे. मी शिवसेनेत जाणार नाही,'' असे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.

नगरचे शिवसेनेचे नेते मुंबईला
दरम्यान, शिवसेनेचे नगर संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते, शुभम बेंद्रे तसेच इतर कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सोशल मीडियाच्या पोस्टबाबत चर्चा केली. त्या वेळी शिंदे यांनी  नगरच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. शिंदे व आमदार जगताप यांची भेट झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. तसेच कोणतेही बोलणे झालेले नाही. केडगाव येथे झालेल्या हत्याकांडात दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्राण गमवावे लागले. ही बाब अतिशय गंभीर आहे. या सर्व पाश्वभूमीवर आमदार जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा कोणताही संबंध नाही, असे एकनाथ शिंदे यांनी नगरच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com