Will NCP give Ticket to Rajashree Munde | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

बीडमधून प्रितम मुंडेंच्या विरोधात राजश्री मुंडे?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 मार्च 2019

भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार डाॅ. प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या शोधात असून त्यांच्या विरोधात विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी सौ. राजश्री यांना उमेदवारी दिली जाण्याची मागणी केली जात आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी याबाबत कुठलेही वक्तव्य केलेले नसले, तरी सौ. मुंडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार डाॅ. प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या शोधात असून त्यांच्या विरोधात विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी सौ. राजश्री यांना उमेदवारी दिली जाण्याची मागणी केली जात आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी याबाबत कुठलेही वक्तव्य केलेले नसले, तरी सौ. मुंडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत धनंजय मुंडे यांच्या बी-४ बंगल्यावर बैठक सुरु आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील हे या बैठकीला उपस्थित आहेत. बीडचे प्रमुख पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. सुरुवातीला बीडच्या उमेदवाराबद्दल निर्णय होऊन मग अन्य जागांबाबत विचार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीचे बहुतांश उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांकडून सौ. मुंडे यांचे नांव पुढे केले जात असले तरी स्वतः धनंजय मुंडे यांनी मात्र त्याला सहमती दिलेली नाही, असे समजते.

बीडमधून भाजपच्या प्रितम मुंडे यांना शह देण्यासाठी मुंडे कुटुंबातलेच कुणीतरी असावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यातून सौ. राजश्री यांचे नांव पुढे आले आहे. सौ. मुंडे या सामाजिक कामात आघाडीवर आहेत. तसेच परळी डेअरी, संत जगमित्रनागा सूतगिरणी यासारख्या अन्य काही कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. राजकारणाशी थेट संबंध नसला तरी जिल्हा परिषद व अन्य निवडणुकांमध्ये त्या पक्षाच्या प्रचारासाठी उतरतात.

 

 

संबंधित लेख