Will Navneet Rana join BJP or remain in NCP ? | Sarkarnama

नवनीत राणा राष्ट्रवादीत कायम राहणार की भाजपमध्ये जाणार ?

सुरेंद्र चापोरकर   : सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

अमरावती  :  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुढील आठवड्यात विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याने विदर्भात मरगळलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला उभारी मिळणार काय? अमरावतीतील नवनीत राणा राष्ट्रवादीत कायम राहणार काय? हे सुद्धा अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट होणार आहे. 

अमरावती  :  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुढील आठवड्यात विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याने विदर्भात मरगळलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला उभारी मिळणार काय? अमरावतीतील नवनीत राणा राष्ट्रवादीत कायम राहणार काय? हे सुद्धा अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट होणार आहे. 

येत्या 13 व 14 ऑक्‍टोबरला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते नागपूर, वर्धा व अमरावती जिल्ह्यांचा दौरा करणार व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन अत्यंत कमजोर आहे. 

विदर्भात राष्ट्रवादीचे केवळ एकच आमदार आहेत . नागपूर महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ एकच नगरसेवक निवडून आला आहे. यापूर्वी 6 नगरसेवक महापालिकेत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला समाधानकारक यश मिळाले नाही. 

या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ते 13 ऑक्‍टोबरला नागपूर शहर व नागपूर ग्रामीणच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. येत्या काही महिन्यात नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने कार्यकर्त्यांची चाचपणी केली जाणार आहे.

14 ऑक्‍टोबरला वर्धा व अमरावती जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. वर्धा जिल्ह्यात माजी आमदार सुरेश देशमुख व माजी आमदार राजू तिमांडे वगळल्यास जिल्ह्यात दखलपात्र नेते नाहीत. अमरावती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून अपक्ष आमदार रवि राणा यांच्या पत्नी व अभिनेत्री नवनीत राणा यांनी निवडणूक लढविली होती. 

नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना अजित पवार अमरावतीला आले होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपने अद्यापही त्यांना पक्षात घेतले नाही. भाजपकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कायम राहण्याचा मानस त्यांनी केल्याचे समजते. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे भाजपच्या श्रेष्ठींनी नवनीत राणा यांना प्रवेश दिला नाही. अजित पवार यांच्या दौऱ्यात नवनीत राणा उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. 

संबंधित लेख