will maratha samaj listen to both chatrapatis? | Sarkarnama

दोन्ही छत्रपतींचा शब्द मराठा समाज मानणार का?

उमेश घोंगडे
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी राजे यांनी नेतृत्व करावे. समाजाला त्यांनी शांततेचे आवाहन करावे, अशी मागणी  प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

गायकवाड यांनी ही मागणी केली असली तरी सध्या सुरू असलेले आंदोलन हे विनानेतृत्त्व सुरू आहे. या दोन्ही छत्रपतींचे नेतृत्त्व स्वीकारण्यास रस्त्यावरील समाज तयार होणार का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. खासदार असलेल्या या दोन्ही छत्रपतींनी संसदेत मराठा आऱक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.

छत्रपती संभाजीराजे हे थेट भाजपशी संलग्न आहे. उदयनराजे हे राष्ट्रवादीत असले तरी भाजपच्या नेत्यांच्याही जवळ आहेत. या दोघांना मानणारा मोठा समाज आहे. त्यांच्या शब्दाला वजनही आहे. असे असले तरी छत्रपती उदयनराजे यांच्या साताऱ्यात झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. संभाजीराजेंनीही शांततेचे आवाहन केले तरी त्यानुसार अद्याप धगधग शांत झाल्याचे दिसत नाही.

संभाजी ब्रिगेडने याबाबत आता दोन्ही छत्रपतींनी एकत्र आणण्याची भूमिका घेतली आहे. अर्थात हे आंदोलन एकट्या संभाजी ब्रिगेडचही राहिलेले नाही. सर्वपक्षीय तरूण, पक्षाशी संबंध नसलेली मंडळी या आंदोलनात उतरली आहेत.

दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने सरकारच्या विरोधात थेट भूमिका घेतली आहे. रस्त्यावर आंदोलन करणारे भाड़ोत्री गुंड असल्याची टीका करणारे चंद्रकांतदादा पाटील व वारकरी लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी मराठा समाजाची बदनामी करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी निषेध केला आहे.

पंढरपुरमध्ये आषाढ़ी वारीत गर्दीत साप सोडून गोंधळ माजवणयाचा प्रयत्न असल्याचे सांगत फडणवीस यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबद्दल माझे मत चांगले होते मात्र, आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवाबद्दल त्यांचे चुकीचे वक्तव्य निषेधास पात्र असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख