भाजपवर विश्वास ठेऊन युती करुन पाहू - उद्धव ठाकरेंनी केली निकटच्या लोकांशी चर्चा

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवेसेनेला १४४ जागा देणार आहे. भाजपवर विश्वास ठेऊन या निवडणुकीत भाजपशी युती करु, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या निकटच्या मंडळींना सांगितले असल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षे एकेका पक्षाकडे असावे, हा प्रस्ताव भाजपला अमान्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
भाजपवर विश्वास ठेऊन युती करुन पाहू - उद्धव ठाकरेंनी केली निकटच्या लोकांशी चर्चा

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवेसेनेला १४४ जागा देणार आहे. भाजपवर विश्वास ठेऊन या निवडणुकीत भाजपशी युती करु, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या निकटच्या मंडळींना सांगितले असल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षे एकेका पक्षाकडे असावे, हा प्रस्ताव भाजपला अमान्य असल्याचे सांगण्यात आले आहे.  

भाजप शिवसेनेच्या युतीवर आज सायंकाळी अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून त्या चर्चेत उभय नेते लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावर शिक्कामोर्तब करतील. दरम्यान या बैठकीआधी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेते पदाधिकाऱ्यांचा काही सूचना दिल्या आहेत. शिवसेनेच्या सर्व नेत्यांना अमित शहा यांच्या भेटीच्या वेळी हजर राहण्यास सांगितले आहे. वरळी येथे युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मातोश्रीबाहेर सभागृहात भेट होणार आहे.

दोन्ही पक्षांचे जे काही ठरेल, त्याबाबत माध्यमांना बाईट देण्यास खासदार संजय राऊत यांना सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पालघर, हातकणंगले व सांगली हे तीन मतदारसंघ सेनेकडेच राहण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने युतीबाबतचे तीन प्रस्ताव तयार केले असून त्यावर चर्चा करुन अंतीम प्रस्ताव तयार केला जाईल. विधानसभा मतदारसंघांच्या अदलाबदलीबाबत चंद्रकांत पाटील व सुभाष देसाई यांच्यात चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com