Will join the party who will Give best offer says Apoorva Hire | Sarkarnama

विधानसभेसाठी चांगली ऑफर देईल त्या पक्षात जाऊ : अपूर्व हिरे 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

नाशिक : "राष्ट्रवादी काँग्रेसशी आमची यापूर्वी चर्चा झाली होती. नुकतेच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी काही प्रस्ताव दिले आहेत. अन्य दोन राजकीय पक्षांचेही पर्याय आहेत. त्यामुळे जो पक्ष विधानसभा निवडणुक उमेदवारीसंदर्भात चांगली 'ऑफर' देईल त्याचा विचार करुन येत्या दिवाळीत राजकीय भूमिका स्पष्ट करीन," असे भाजपचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी आज सांगीतले. 

नुकतीच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी हिरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. यासंदर्भात माजी आमदार डॉ. हिरे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विचारणा झाली. यासंदर्भात तुमची नक्की भूमिका काय आहे याविषयी त्यांनी विचारणा केली. त्यांना आम्ही कळवले आहे, की शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आमच्याकडे आले होते. त्यांच्याशी आमची चर्चा झाली. त्याविषयी आम्ही काहीही लपविलेले नाही. त्यांनी आम्हाला पक्षातर्फे काही 'ऑफर्स' दिल्या आहेत. त्यावर आम्ही विचार करीत आहोत."

ते पुढे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसशी यापूर्वी चर्चा झाली होती. चर्चा झाली नाही हे मी म्हणणार नाही. अजुनही उर्वरीत दोन पक्षांकडूनही प्रस्ताव आलेले आहेत. त्याविषयी आम्ही नकार दिलेला नाही. त्यामुळे या सर्व स्थितीत कुठल्याही निर्णयाप्रत आलेलो नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. आमचे पहिले प्राधान्य विधानसभा निवडणुकाच आहे. लोकसभा हे काही माझे प्राधान्य नाही. त्यामुळे तशा ज्या ऑफर्स राजकीय पक्षांकडून आलेल्या आहेत त्याचा विचार करु. सर्व कार्यकर्त्यांशी बोलुन निर्णय घेतला जाईल. दिवाळीपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही," 

राज्यातील नावाजलेले राजकीय घराणे असलेले, सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असलेले आणि माजी राज्यमंत्री प्रशात हिरे यांचे चिरंजीव माजी आमदार डॉ. हिरे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे 2 ऑगष्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. मात्र, काही कारणास्तव तो लांबणीवर पडला. त्यानंतर शिवसेनेचे खासदार सजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. राजकीयदृष्या ही भेट चर्चेचा विषय ठरली. या भेटीनंतर हिरे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. मात्र पुढे काय? ही अस्थिरता कायम आहे. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख