भाजप सोडून कुठल्याही पक्षाकडून लढणार नाही- लक्ष्मण जगतापांचा खुलासा  

युती झाली, तर भाऊ राष्ट्रवादीत परत जाऊन मावळची लोकसभा लढविणार वा मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही,तर वेगळा विचार करणार अशा बातम्या गेल्या दोन दिवसांत प्रसारमाध्यमांत आल्या. परिणामी या चर्चेने वेग पकडला. तिचा सूर व परिणाम लक्षात येताच भाऊंनी काल रात्री अकरा वाजता आपल्या फेसबुक पेजवर एका ओळीत या उठलेल्या विविध चर्चांचे खंडन केले. त्यामुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांतील संभ्रम दूर होण्यास मदत झाली.
भाजप सोडून कुठल्याही पक्षाकडून लढणार नाही- लक्ष्मण जगतापांचा खुलासा  

पिंपरीः भारतीय जनता पार्टीव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढणार नाही, असा खुलासा या पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व चिंचवडचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या संदरर्भात उठलेल्या विविध चर्चांना त्यांनीच ब्रेक लावला आहे. मात्र, युती झाली नाही तर आगामी लोकसभेला ते भाजपचे उमेदवार असतील, हे सद्धा याव्दारे स्पष्ट झाले आहे. त्यातून त्यांनी आपल्या स्पर्धकांना गॅसवर ठेवले आहे.

युती झाली, तर भाऊ राष्ट्रवादीत परत जाऊन मावळची लोकसभा लढविणार वा मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही,तर वेगळा विचार करणार अशा बातम्या गेल्या दोन दिवसांत प्रसारमाध्यमांत आल्या. परिणामी या चर्चेने वेग पकडला. तिचा सूर  व परिणाम लक्षात येताच भाऊंनी काल रात्री अकरा वाजता आपल्या फेसबुक पेजवर एका ओळीत या उठलेल्या विविध चर्चांचे खंडन केले. त्यामुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांतील संभ्रम दूर होण्यास मदत झाली. तसेच काहींचा विशिष्ट हेतू (भाऊंच्या मंत्रीपदात अडथळा) यामुळे सफल होणार नाही, असे त्यांच्या एका समर्थक नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

त्यातून मंत्रीपदाची चुरस व त्यासाठीच्या टोकदार शर्यतीचा प्रत्ययही आला. राजकारणात कुठल्या स्तराला काही कसे जाऊ शकतात,हे सुद्धा कळले, असे हा भाऊंचा खंदा पाठीराखा म्हणाला. त्यांच्या काही पाठीराख्यांनी आपल्या नेत्याची (भाऊ) ही फेसबुक पोस्ट शेअर करीत वातावरण आणखी निवळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सध्या आमदार असलेले भाऊ हे लोकसभा लढणार नाही हे, मात्र नाकारण्यात आलेले नाही. त्यामुळे युती फिस्कटली, तर ते मावळमधून भाजपचे उमेदवार असू शकतात हे सुद्धा ध्वनित झाले आहे. तसे खुद्द भाऊंनीही आपण मावळचे उमेदवार असू असे यापूर्वीही उठलेल्या अशाच प्रकारच्या वादळावर बोलताना स्पष्ट केलेले आहे. परिणामी त्यांच्यासारखा बलदंड व निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार रिंगणात असण्याच्या शक्यतेने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी अद्याप सुटकेचा श्वास सोडलेला नाही. 

पक्षाचे शहर प्रवक्ते व सरचिटणीस अमोल थोरात यांनीही भाऊंच्या वतीने खुलासा करणारे स्पष्टीकरण आज जारी केले. त्यात ते म्हणतात, 'आमदार जगताप भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 2019 मधील लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा अंदाज निवडणुकीचा सर्व्हे करणाऱ्या काही संस्थांकडून वर्तविण्यात आला आहे. सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांकडून असा चुकीचा प्रचार सुरु आहे. लोकसभेच्या 2019 मधील निवडणूक लढविण्याची,मात्र आमदार जगताप यांची इच्छा आहे. पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी आणि अन्य पक्षही हद्दपार झाले आहेत. त्यामुळेच विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच अशा अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. विरोधकांनी सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी अशा काही चुकीच्या सर्व्हेंचा आधार घेतला आहे. चुकीचा प्रचार आणि प्रसार करणे त्यांचा नित्याचाच ‘उद्योग’ आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही विरोधकांची ही खेळी माहीत झाली आहे. भाजपाच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे झपाट्याने होत आहेत. त्याच जोरावर भाजपचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. सर्वसामान्यांपर्यंत भाजपाला पोहचविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे अफवा पसविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com