४० वर्षे काम करून हां..जी..हां..जी करावे लागते! त्यापेक्षा शेती करीन म्हणतो : मंत्री दिलीप काबंळे

४० वर्षे काम करून हां..जी..हां..जी करावे लागते! त्यापेक्षा शेती करीन म्हणतो : मंत्री दिलीप काबंळे

पुणे : मी गेली ४० वर्षे भाजपत काम करत असून, मला आजही हां..जी हां...जी करावी लागत आहे. त्यामुळे दोन-तार एकर जमीन करुन निवांत शेती करावीशी वाटते. यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या योजना असतील तर मला मदत करा, असे वक्तव्य समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. 

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित १२७ व्या पशुंसवर्धन दिनानिमित्त आयाजित पशुपालक मेळावा व राज्यस्तरीय आभासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास व महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पशुंसवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, महेश लांडगे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव किरण कुरुंदकर, आयुक्त कांतीलाल उमाप आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

मंत्री कांबळे म्हणाले, ``मी सोलापूर जिल्‍ह्याच्या ग्रामीण भागातुन आलो आहे. त्यामुळे मला शेतकरी आणि पशुपलाकांची दुःख माहित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत मी घडल्यामुळे मंत्रिपदावर पोहोचलो आहे. गेली ४० वर्ष काम करत असून ही मला आजही हां...जी, हां...जी... कराव लागत आहे. यामुळे दोनचार एकर जमीन घेऊन निवांत शेती करावेसे वाटत आहे.``

‘मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शेळी मेंढी योजना ण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक सहकार्याने पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. हि योजना आॅगस्ट महिन्यापासुन अंमलात येईल,``असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com