पंकजांच्या गृहखात्याच्या आवडीने मुख्यमंत्री दुखावणार?

पंकजांच्या गृहखात्याच्या आवडीने मुख्यमंत्री दुखावणार?

महेश पांचाळ : सरकारनामा न्यूज ब्यूरो               
मंत्रिमंडळातील गृहखातं आपलं आवडतं खातं आहे, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी  केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्या विरोधातील भाजपमधील अंतर्गत}धुसफूस चव्हाट्यावर आली आहे   पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे  मुख्यमंत्री दुखावले जाण्याची शक्यता आहे.      

पंकजा मुंडे यांनी बीड मधील माजलगावमधील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस निवासस्थानाच्या उद्घाटनावेळी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या असल्या तरी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचा रोष आणखिन ओढवून घेण्याची शक्यता आहे . राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर  ग्रामविकास खाते सांभाळणाऱ्या पंकजा ताई यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिली नव्हती. मात्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शर्यतीत असलेल्या पक्षातील स्पर्धेकाचे अप्रत्यक्ष पंख कापले होते.

त्यामुळे एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्या सारख्या नेत्यांना जागेवर स्थिर ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यांना सध्या तरी यश आलेले आहे. चिक्की घोटाळयाचा आरोप झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना अडचंनित आणण्याच्या प्रयत्न झाला होता. परंतू गोपीनाथ मुंडे यांचा वारस म्हणून पंकजा ताईची  ओळख निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यापुढे कोणताही निर्णय घेणे अवघड होऊन बसलेले आहे. त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याबाबत पंकजा मुंडे यांनी  इच्छा व्यक्त केल्यामुळे देवेन्द्र फडणवीस यांना टोला लागावण्याचा प्रयत्न केला अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.          

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत हुशारीने गृह खाते स्व ताकडे ठेवले आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात मुख्यमंत्री पदा वरील व्यक्तिने गृहमंत्री पद स्वता कडे ठेवलेले नव्हते. एवढेच नव्हे तर शिवसेना भाजप युतीच्या काळात सेनेचा मुख्यमंत्री होता. परंतू, गृहमंत्रीपद  भाजपाच्या वाट्याला आले होते. गृहमंत्री  गोपीनाथ मुंडे यांनी या खात्याचा समर्थपणे कारभार करत भाजपाचा महाराष्ट्र मध्ये दबदबा निर्माण करण्यात यश मिळवले.  त्यामुळे वारसा हक्काने पंकजा यांनी गृहखात्याबाबत इच्छा व्यक्त करुन मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंधारण खाते पंकजा मुंडे यांच्या कडून कडून राम शिंदे यांच्या कडे दिले होते. त्यावेळी पंकजा नाराज झाल्या होत्या. मुख्यमंत्री पदावर असेपर्यंत गृह खाते स्वतःकडे ठेवेन असे फडणवीस यांनी खाजगीत बोलताना सांगितले आहे. त्यामुळे पंकजा यांनी गृहमंत्री पदाबाबत मत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष दुखावण्याचा प्रयत्न केला आहे

पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची बातमी खालील लिंकवर उपलब्ध आहे -

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com