will chetan tupe lead ncp successfully | Sarkarnama

राष्ट्रवादीची पुण्याची पाटिलकी चेतन तुपेंना झेपणार का?

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पुणे : विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत सत्तेच्या वर्तुळातून बाहेर फेकलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रुबाब वाढविण्याची जबाबदारी चेतन तुपेंकडे आली आहे. पक्षाचा दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी तुपेंना आता खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरावे लागणार आहे. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळून त्यांची भलीमोठी फौज उभारण्याचे आव्हानही त्यांना पेलावे लागेल. तेव्हाच, गटातटामुळे कुरघोडीच्या राजकारणात रमलेले नेते आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी तुपेंना आपला राजकीय मुत्सद्दीपणा दाखवावा लागेल. 

शहराच्या राजकारणात चेतन यांचे वडिल माजी खासदार (कै.) विठ्ठल तुपे यांचे वजन होते. त्यांचा राजकीय वारसा चेतन यांच्याकडे आला. तुपे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने विधानसभेची उमेदवारी न दिल्याने 2004 मध्ये चेतन यांच्या आई लिलावती तुपे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढविली. त्यानंतर तुपे कुटुंबिय पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले आणि राजकारणात सक्रिय झाले. 

त्यानंतर 2007 च्या महापालिका निवडणुकीत चेतन पहिल्यांदा नगरसेवक झाले. उच्चशिक्षित चेतन यांनी पहिल्यावहिल्या "टर्म'मध्येच सभागृहात आपल्या अभ्यासाच्या बळावर छाप पाडण्याचा प्रयत्न केला. पण, पक्षातर्गंत गटबाजीचा ते बळी ठरले. त्यानंतरच्या 2012 च्या निवडणुकीत चेतन दुसऱ्यांदा निवडून आले. या काळात त्यांच्याकडे शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद आले. तेव्हा मात्र, विविध विषयांवर भूमिका मांडत चेतन यांनी आपल्यातील नेतृत्त्वगुणाची झलक दाखविली. मात्र, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ सदस्यांच्या खेळीचा फटका त्यांना बसत राहिला. त्यामुळे तुपे निर्णयप्रकियेपासून चार हात लांब राहाणे पसंत करीत होते. याच काळात चेतन हे "पाटीलकी'च्या थाटात वावरत असल्याची चर्चा पक्षात होती. 

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची पिछेहाट झाली, सलग दहा वर्षांची सत्ता या पक्षाला गमवून या पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागले. तेव्हा, विरोधीपक्षनेतेपद तुपेंकडे आले. गेल्या दीड वर्षातील तुपेंच्या कामगिरीबाबत नेतृत्व समाधानी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शहराध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला. 

आगामी निवडणुकीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही जबाबदारी नेटाने पार पाडून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी तुपेंना संघटनेत चैतन्य निर्माण करण्यासाठी झटावे लागणार आहे. पहिल्यांदा प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांचे जाळे विणून त्यांच्यापुढे नवा अजेंडा मांडावा लागेल. त्यासाठी तुपेंना कष्ट घ्यावे लागतील, ज्यामुळे त्यांना "पाटीलकी'च्या थाटातून बाहेर पडावेच लागेल, हे मात्र, नक्की.  

वाचा आधीची बातमी- चेतन तुपे यांची राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड

तुपेंच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी तांबे, धनकवडे आणि बराटेंची फिल्डींग

संबंधित लेख