Will Like to be in Loksabha Says Ramraje Nimbalkar | Sarkarnama

लोकसभेत जायला आवडेल; उदयनराजेंना रिप्लेस करणार का, हे पवार साहेब ठरवतील : रामराजे निंबाळकर 

संपत देवगिरे 
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

मी हाडाचा शिक्षक आहे. मला लोकसभेत जायला आवडेल. मात्र, मी छत्रपती उदयनराजेंना रिप्लेस करणार की नाही, हे पक्ष आणि पवार साहेब ठरवतील. त्यावर मी कसे बोलू?, असे प्रतिपादन परिषदेचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी आज येथे केले.

नाशिक : मी हाडाचा शिक्षक आहे. मला लोकसभेत जायला आवडेल. मात्र, मी छत्रपती उदयनराजेंना रिप्लेस करणार की नाही, हे पक्ष आणि पवार साहेब ठरवतील. त्यावर मी कसे बोलू?, असे प्रतिपादन परिषदेचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी आज येथे केले.

येथील कुसुमाग्रज स्मारकात निमंत्रितांशी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाशिक वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी सातारा मतदारसंघातील राजकारणाची सध्या खूप चर्चा आहे. त्यात आपल्या उमेदवारीची चर्चा आहे. आपण खासदार उदयनराजेंना रिप्लेस करणार का? असा प्रश्‍न विचारला. त्यावर ते म्हणाले, "मी उदयनराजेंना रिप्लेस करणार की नाही, यासह काय निर्णय घ्यायचे हे पक्ष आणि पवार साहेब ठरवतील. मात्र, मी मूळ फलटणचा आहे. तो मतदारसंघ सातारा मतदारसंघात नाही. फलटण माढा मतदारसंघात समाविष्ट आहे. साताऱ्यातून उमेदवारी करायला अडचण नाही. राहिला माझा प्रश्‍न. तर मी हाडाचा शिक्षक आहे. मला लोकसभेत काम करायला आवडेल," अर्थात उदयनराजे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी अनेक पिढ्यांपासून अतिशय मधूर संबंध आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

ते पुढे म्हणाले, ''मला विविध विषयांच्या अभ्यासात खुप रस आहे. त्यामुळे मला मुळातच विधानसभेपेक्षा वरच्या सभागृहात जायला आवडेल असे, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खूप वर्षांपूर्वी सांगीतले होते. माझा मतदारसंघ राखीव झाल्यावर पवार साहेबांनी मला राज्यात वरच्या सभागृहात काम करण्याची संधी दिली."

कुसुमाग्रज स्मारकाचे सचिव मकरंद हिंगणे यांनी निंबाळकर यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार टकले, अॅड. विलास लोणारी, रयत शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. भगीरथ शिंदे, अॅड. जयंत जायभावे, माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, भारती पवार आदी उपस्थित होते. 

२०१९ च्या आगामी निवडणुकीचे अनेक अंदाज, राजकीय समिकरणांवर अचूक भाष्य करणारे राज्यव्यापी सर्वेक्षण - फक्त सरकारनामा दिवाळी अंकात - अॅमेझाॅनवर सवलतीच्या दरात - येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी -

व्हॉट्सअॅप : 91300 88459 

फोन : 9881598815

संबंधित लेख