why shivtare silent | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

खंबाटकीतील आपत्तीबद्दल शिवतारे गप्प कां? 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जून 2017

खंबाटकी घाटात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच उपाययोजना करण्याबाबत संबंधित कंपनी आणि प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकमंत्री शिवतारेंनी बैठक घेऊन संबंधितांना तातडीने उपाय योजना करण्यास लावले पाहिजे. तरच पावसाळ्यात खंबाटकीच्या घाटातील प्रवास सुरक्षित होऊ शकेल. 

सातारा : खंबाटकी घाटात झालेल्या अतिवृष्टीत महामार्गावर आलेल्या पाणयामुळे आपत्कालिन स्थिती उद्‌भवली. वाहनचालक, प्रवासी लोकांच्या जीवावर बेतण्याचा प्रकार दोन दिवसांपुर्वी घडला. यावर सर्वांगीण चर्चा सुरु असताना पालकमंत्री विजय शिवतार मात्र गप्प असल्याचे दिसत आहेत. त्यांनी तातडीने लक्ष न दिल्यास भविष्यात कात्रज घाटासारखी दुर्घटना खंबाटकी घाटातही घडू शकते. 

महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. काही ठिकाणी ते पूर्ण झाले आहे, पण पावसाचे पाणी बाजूला जाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे न केल्याने अनेक ठिकाणी साचून राहत आहे. यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनचालकांना जीवमुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. नुकत्याच झालेल्या पावसात खंबाटकी घाटात अचानक डोंगरावरून पाणी थेट महामार्गावर आले आणि वाहनचालकांची त्रेधातिरपिट उडाली. डोंगराच्या बाजूने पाणी जाण्याची व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावर आले. 

खंबाटकी घाटात महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून डोंगराच्या बाजूने पोकलॅन मशिनच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले आहे. हे काम करताना कडेने जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेची कोणतीच उपाय योजना केलेली नाही. जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेच्यादृष्टीने संबंधित कंपनी व आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेणे आवश्‍यक आहे. पण पावसाळा सुरू झालातरी अद्याप काहीही घडलेले नाही. मागील पावसाळ्यात तसेच मध्यंतरी महामार्गावरील पुलांची कामे निकृष्ट झाल्यानंतर पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तातडीने बैठक घेऊन रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यांनी थेट रिलायन्सचे अध्यक्ष अनिल अंबानींशी बोलण्याचे विधान केले होते. पण खंबाटकी घाटातील घटनेनंतर मात्र, पालकमंत्र्यांकडून कोणतीच सूचना आलेली नाही. 

 

संबंधित लेख