चंद्रकांतदादांवरील टीकेमुळे राजेश क्षीरसागर यांचे मंत्रीपद हुकले?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील भुमिका आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळेच आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात विधानसभेचे सहा आमदार असले तरी मंत्रीपदासाठी श्री. क्षीरसागर हेच प्रमुख दावेदार होते, त्यासाठी ते मुंबईत तळ ठोकून होते, पण ऐनवेळी त्यांचे नांव मागे पडले व त्यांची निती आयोगाच्या अध्यक्षपदी बोळवण करण्यात आल्याचे बोलले जाते.
चंद्रकांतदादांवरील टीकेमुळे राजेश क्षीरसागर यांचे मंत्रीपद हुकले?

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील भुमिका आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळेच आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात विधानसभेचे सहा आमदार असले तरी मंत्रीपदासाठी श्री. क्षीरसागर हेच प्रमुख दावेदार होते, त्यासाठी ते मुंबईत तळ ठोकून होते, पण ऐनवेळी त्यांचे नांव मागे पडले व त्यांची निती आयोगाच्या अध्यक्षपदी बोळवण करण्यात आल्याचे बोलले जाते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्हीही जागावर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 2014 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील दहापैकी सहा आमदार सेनेचे आहेत. शिवसेनेची ही वाढलेली ताकद पाहता मंत्रीमंडळ विस्तारात जिल्ह्याला नक्की स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. त्यात क्षीरसागर हे कट्टर शिवसैनिक आहेत, आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचा आवाजही बुलंद केला आहे. त्यामुळे त्यांच्याच गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्‍यता होती. पण त्यांच्या विरोधातच पक्षातून तसेच युतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपातून मोठ्या प्रमाणात तक्रारी पक्ष नेतृत्त्वाकडे झाल्या आहेत. त्यातूनच त्यांचा पत्ता कापला गेल्याचे समजते.

राज्यात गेली चार वर्षे शिवसेना व भाजपा नेत्यांत आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संधी मिळेल तिथे टिका केली. त्याचेच लोण महाराष्ट्रभर पसरले. त्यातून कोल्हापुरात क्षीरसागर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच टिकेचे लक्ष केले. जिल्ह्यातील अपवाद वगळता सेनेचे इतर आमदार शांत असताना  क्षीरसागर यांनी मात्र पाटील यांच्या संपत्तीपासून ते इतर अनेक मुद्यांवर जहरी टिका केली. त्यातून लोकसभेचे मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभेत युती झाल्यास क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करणार नसल्याचे सांगून याला तोंड फोडले होते.

दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शेवटच्या टप्प्यातील क्षीरसागर यांच्या भुमिकेवरच संशय व्यक्त करण्यात आला होता. पक्षप्रमुख ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात मुंबईहून काही लोक मतदार संघात पाठवून पक्षाचे काम कोण प्रामाणिकपणे करतो किंवा नाही याची खातरजमा केली होती. त्यात क्षीरसागर यांच्याविषयीही तक्रारीचा अहवाल ठाकरे यांच्याकडे पोहचल्याचे समजते. मंत्री पद मिळण्यात या दोन गोष्टी क्षीरसागर यांच्या आड आल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com