Why Laxman Jagtap lost his cool | Sarkarnama

भाऊको गुस्सा क्‍यू आता है

उत्तम कुटे
सोमवार, 10 एप्रिल 2017

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष झाल्यापासून अतिशय शांत राहणारे व मुद्देसूद आणि मुत्सद्दीपणे वागू व बोलू लागलेले चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप तथा भाऊ हे शनिवारी अचानक भडकले. वड्याचे तेल वांग्यावर निघाले आणि पालिकेचे जनसंपर्क अधिकारी अण्णा बोदडे भाऊंच्या संतापाचे शिकार झाले.

पिंपरी - भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष झाल्यापासून अतिशय शांत राहणारे व मुद्देसूद आणि मुत्सद्दीपणे वागू व बोलू लागलेले चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप तथा भाऊ हे शनिवारी अचानक भडकले. वड्याचे तेल वांग्यावर निघाले आणि पालिकेचे जनसंपर्क अधिकारी अण्णा बोदडे भाऊंच्या संतापाचे शिकार झाले. एवढेच नाही, तर लालबुंद झालेल्या भाऊंनी अण्णांना दिलेले प्रमोशन काढून घेण्यासही आपल्या पालिका पदाधिकाऱ्यांना सांगितले.

त्याचे असे झाले. महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका दरवर्षी महोत्सव आयोजित करते. त्याची माहिती माध्यमांना महोत्सवाच्या अगोदर काही दिवस दिली जाते. यावर्षी हा महोत्सव 11 ते 15 एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याबाबत शनिवारी (ता.8) पालिकेतर्फे एका पत्रकारपरिषदेचे आयोजन पिंपरीतील शहर भाजप कार्यालयाजवळील हॉटेलात करण्यात आले होते. एवढ्या महत्त्वाच्या "प्रेस'साठी आपल्याला का बोलावण्यात आले नाही? त्याची माहिती का दिली नाही? यावरून भाऊ रागावले. त्यांनी पालिकेचे बोदडे यांना पदाधिकारी आणि पत्रकारांसमोरच फैलावर घेतले.

बोदडेंना देण्यात आलेले प्रमोशन (सहाय्यक आयुक्त) काढून घ्या, असेही त्यांनी आपले पालिकेतील सभागृह नेते व स्थायी समिती अध्यक्षांना सांगितले. अतिशय शांत व मितभाषी स्वभावाचे मुद्देसूद व मुत्सद्दीपणे वागणारे आणि बोलणारे भाऊ एवढे संतापलेले पाहून सर्वजण अवाक झाले. मात्र, त्यामागील कारण प्रत्यक्षात दुसरेच असल्याचे नंतर समजले. भाऊंचे खंदे समर्थक असलेल्या त्यांच्या मर्जीतील एक महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांविरुद्ध एका पत्रकाराने पालिकेच्या व्हॉटसअप ग्रुपवर एक वादग्रस्त पोष्ट टाकली होती. त्याबाबत त्या महिलेने भाऊंकडे केली होती. त्यामुळे त्यामुळे ते 'डिस्टर्ब' झाले. मात्र,पत्रकारावर रागावता येत नव्हते. त्याचवेळी पालिका महोत्सवाच्या पत्रकारपरिषदेला आमंत्रित न केल्याचे निमित्त साधून भाऊंचा राग बाहेर पडला आणि वड्याचे तेल वांग्यावर निघाले.

 

संबंधित लेख