Why KP Patil was made president of parallel meeting | Sarkarnama

के.पीं.ना समांतर सभेचे अध्यक्ष का केले? 

सदानंद पाटील 
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

विरोधकांनी समांतर सभेचे आयोजन करुन गोकुळ मल्टीस्टेटवर हल्ला केला.

कोल्हापूर : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेत मल्टीस्टेटचा मुददा गाजला. सत्ताधाऱ्यांनी ही सभा रेटून नेली. तर विरोधकांनी समांतर सभेचे आयोजन करुन गोकुळ मल्टीस्टेटवर हल्ला केला. मात्र या समातंर सभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी.पाटील यांच्याकडे दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

गोकुळच्या सर्वसाधरण सभेकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष होते. या सभेत मल्टिस्टेटचा ठराव येणार असल्याने त्याला आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतराव पाटील यांनी कडाडून विरोध केला. या लढाईत राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी.पाटील हे सहभागी झाले. मात्र त्यांनी आपला विरोध मल्टिस्टेटला नसून महाडिक यांना असल्याचे जाहीर केले होते. दरम्यानच्या काळात पाटील यांच्या नावाची लोकसभा उमेदवार म्हणून पेरणी करण्यात आली. 

के.पी पाटील यांचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे चांगले संबंध असल्याने राधानगरी-भुदरगडमधून काहीतरी वेगळा प्रकार होवू नये, यासाठीच मल्टिस्टेटच्या लढाईत अनेक ज्येष्ठ व जुनी मंडळी असताना देखील जाणीवपूर्वक के.पी.पाटील यांनाच समातंर सभेचे अध्यक्षपद दिल्याची चर्चा जिल्ह्यात होवू लागली आहे.

संबंधित लेख