Why the government is hitting hard to farmers ? : MLA Bajoria | Sarkarnama

सरकार शेतकऱ्यांना का मारतयं? : अामदार बाजाेरिया

श्रीकांत पाचकवडे: सरकारनामा ब्युराे
सोमवार, 1 मे 2017

 शिवसेना सत्तेत सहभागी असूनही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरूण अांदाेलन करीत अाहे. सत्तेत सहभाग केवळ सरकावर अंकुश ठेवण्यासाठी शेतकरी हिताशी कधीही तडजाेड केली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वीस दिवस सभागृह बंद पाडून सरकारच्या धाेरणांचा तीव्र निषेध केला.

अकाेला:  कटप्पाने बाहुबलीला का मारलं? हे सर्वांना समजले अाहे. मात्र, शेतकरी हिताच्या गप्पा करणारे भाजप सरकार शेतकऱ्यांना का मारतयं? याचे उत्तर अद्यापही मिळाले नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता त्यांना संपूर्ण कर्जमुक्ती दिल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकरी कर्ज माफीसाठी शनिवारी  (ता.5) शिवसेना रूमणे माेर्चा काढणार असल्याचे अामदार गाेपिकीशन बाजाेरिया यांनी सांगितले.

गेल्या दाेन वर्षापासून देशात एकच प्रश्न चर्चीला जात हाेता. कटप्पाने बाहुबली ला का मारलं? त्याचे उत्तर बाहुबली चित्रपटाच्या दुसऱ्या प्रदर्शनानंतर मिळाले. मात्र, शेतकऱ्यांना भाजप सरकार का मारतयं? याचे उत्तर अद्यापही मिळालेली नाही. निवडणुक काळात शेतकरी हिताचा कळवळा दाखवत सत्तेवर बसलेले भाजप सरकारचा खरा चेहरा समाेर अाला अाहे. त्याचे शेतकरी प्रेम केवळ देखावा अाहे. शेतकरी हिताचे, त्यांच्या दुःखाचे भाजप सरकारला काही देणे-घेणे नसल्याची जनभावना समाेर येत अाहे.

 शिवसेना सत्तेत सहभागी असूनही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरूण अांदाेलन करीत अाहे. सत्तेत सहभाग केवळ सरकावर अंकुश ठेवण्यासाठी शेतकरी हिताशी कधीही तडजाेड केली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वीस दिवस सभागृह बंद पाडून सरकारच्या धाेरणांचा तीव्र निषेध केला.राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे.

 मात्र, हे दळभद्री सरकार अजूनही कुंभकर्णी झाेपेतून जागे झाले नसल्याने सरकारच्या शेतकरी अडवणुकीच्या धाेरणांविराेधात अाता रूमणे माेर्चा काढून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी एल्गार पुकारला अाहे. शिवसेना पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या या माेर्चाच्या पुर्वतयारीसाठी 140 गावात शेतकऱ्यांच्या सभा घेण्यात अाल्या अाहेत. शिवसेना सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांसह बाळापूर येथून निघणाऱ्या माेर्चात सुमारे सात हजारावर शेतकरी सहभागी हाेणार असल्याचे अामदार बाजाेरिया यांनी सांगितले.

संबंधित लेख