Why don't the government take resignation of Akbar ? : Prithviraj chavan | Sarkarnama

एम. जे. अकबर यांचा राजीनामा वाजत-गाजत  घेणार का ? : पृथ्वीराज चव्हाण

माधव इतबारे
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या हाताखाली एम. जे. अकबर काम करतात.'मी-टू' मोहिमेत त्यांच्यावर आरोप झाले.

औरंगाबाद: "मी-टू' मोहिमेत आरोप झालेले केंद्रीय विदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा काय वाजत-गाजत घेणार का? त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी (ता. 13) केली. 

कॉंग्रेसतर्फे शनिवारी शहरात दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण म्हणाले, "विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या हाताखाली एम. जे. अकबर काम करतात.'मी-टू' मोहिमेत त्यांच्यावर आरोप झाले. ते विदेशातून येतील, त्यानंतर राजीनामा देतील, असे सांगितले जात आहेत. एवढा सन्मान कशासाठी? स्वराज यांनी पंतप्रधानांकडे जाऊन त्यांच्या हकालपट्टीसाठी हट्ट धरला पाहिजे'', असे चव्हाण यांनी नमूद केले.

 

संबंधित लेख