why does Bhima Army Chief Chandrasekhar Ravana keep under house arrest, says prakash ambedkar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांना नजरकैदेत का ठेवले ? : प्रकाश आंबेडकर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

भीमा कोरेगाव येथील अभिवादन कार्यक्रमासाठी आलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांना मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवले असून शासनाच्या या कृतीचा भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत निषेध केला.

अकोला : भीमा कोरेगाव येथील अभिवादन कार्यक्रमासाठी आलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांना मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवले असून शासनाच्या या कृतीचा भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत निषेध केला.

सरकारने रावण यांना कोणत्या कारणासाठी नजरकैदेत ठेवले याचा त्वरीत खुलासा करावा, अशी मागणी करीत सरकार पुन्हा सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अॅड. आंबेडकर यांनी शुक्रवार (ता.28) आयोजित पत्रकार परिषदेत केला. 

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सर्व समाजघटक अभिवादन करण्यासाठी सहभागी होणार आहेत. मात्र सत्ताधारी भाजप सरकार पुन्हा सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे. भीमा कोरेगावच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चंद्रशेखर रावण मुंबईत आज आले. 

मालाड मधील एका हॉटेलमध्ये ते थांबले असताना पोलिसांनी तेथे चेकिंग करुण त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. कोणताही गुन्हा त्यांनी केला नसतांना त्यांना नजरकैदेत ठेवण्याची सरकारची ही कृती दडपशाही असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. सरकारने रावण यांची त्वरीत मुक्तता करुण त्यांना अभिवादन कार्यक्रमासाठी येऊ द्यावे. सामाजिक स्वास्थ्य बिघडू देऊ नये,  सर्व समाजघटकांनी शांतता राखावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

संबंधित लेख