Why Dhanajay Munde is keeping mum on Vaidyanath Sugar ? Kalidas apet | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

गंगाखेड शुगरबद्दल बोलणारे धनंजय मुंडे वैद्यनाथबद्दल गप्प का ? - कालिदास आपेट 

दत्ता देशमुख 
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

रासप नेते रत्नाकर गुट्टे हे धनंजय मुंडे यांचे मेहुणे मधुसूदन केंद्रे यांचे राजकीय विरोधक आहेत. रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अनेक वेळा आवाज उठविलेला आहे. मात्र, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथबद्दल ते गप्प का, असा सवाल कालिदास अपेट यांनी केला.

बीड : रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर या साखर कारखान्याबद्दल नेहमी आवाज उठविणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याबाबत गप्प का? असा सवाल शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास अपेट यांनी केला. 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सरत्या गाळप हंगामातील ‘एफआरपी’ रक्कम अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. 
बीड - नगर - परळी लोहमार्गाची कामे, मुख्यमंत्री सडक योजनेतील कामांचे ठेके दोघांच्याही समर्थकांना मिळतात. या कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत दोघांचीही चुप्पीच असते. तर, परळीतला जलयुक्त शिवारचा अपहार असेल तर धनंजय मुंडे गप्प राहीलेले आहेत आणि परळी पालिकेच्या अनियमिततेबाबत पंकजांनीही कायम मौन धारण केलेले आहे.

 त्यामुळे कालिदास अपेट यांनी कारखान्याच्या एफआरपीचा मुद्दा उपस्थित करुन धनंजय मुंडे यांना सवाल केला असला तरी त्यांच्या या वक्तव्यातून या मुंडे भावंडे ‘एकच’ अशी होणारी चर्चा खरी या मर्मावर तर बोट ठेवले नाही ना असेही राजकीय जाणकारणांचे मत आहे. 

कारखान्यात गाळपाला ऊस घातल्यानंतर शेतकऱ्यांना १४ दिवसांत ‘एफआरपी’ची रक्कम एकरकमी देण्याची कायदेशिर तरतूद आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सन २०१७-१८ च्या गाळप हंगामाची ‘एफआरपी’ आजतागायत दिली नाही असेही कालिदास अपेट म्हणाले. रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर बद्दल नेहमी आक्रमकपणे आवाज उठविणारे धनंजय मुंडे वैद्यनाथ साखर कारखान्याबाबत गप्प का? असा सवालही त्यांनी केला.

समान काम समान वेतन कायद्यानुसार ऊसतोडणी मजूराला हार्वेस्टरप्रमाणे प्रतिटन चारशे रुपये मिळावेत, प्रतिटन साडेतीन हजार रुपये पहिला हप्ता द्यावा, दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतराची अट काढून टाकावी, शासकीय वहातुक दराप्रमाणे ऊसवहातुक मिळावी आणि इथेनॉलचा इंधन म्हणून वापर बंधनकारक करावा या मागण्यासाठी ११ सप्टेंबरला सिरसाळा (ता. परळी) शेतकरी, वाहतुक ठेकेदार, व ऊसतोडणी कामगारांची संयुक्त ऊस परिषद शेतकरी संघटनेने आयोजित केली आहे. याच्या प्रचारासाठी बुधवारी मोहा (ता. परळी) येथे आयोजित सभेत श्री. अपेट बोलत होते.

संबंधित लेख